गंधर्वगड येथील चाळोबा देवाच्या यात्रेला रविवारी प्रारंभ, सोमवारी सांगता - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2020

गंधर्वगड येथील चाळोबा देवाच्या यात्रेला रविवारी प्रारंभ, सोमवारी सांगता

चंदगड/ प्रतिनिधी
गंधर्वगड (ता. चंदगड)  येथील श्री चाळोबा देवालयाची वार्षिक यात्रा रविवार १६ फेब्रुवारी 2020 रोजी होणार आहे. चौऱ्यांऐशी खेड्याचे ग्रामदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री चाळोबा देवालयाकडे मागितलेले नवस पूर्ण होतो , अशी भाविकांची धारणा आहे. रविवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून नवस फेडणे,नवस मागणी करणे आदीसह धार्मिक कार्यक्रम  होणार आहेत. रात्री 11 वाजता "बिजली कडाडली" हा सामाजिक, तमाशाप्रधान नाट्यप्रयोग होणार आहे. या नाटकाचे उद्धाटन उद्योजक शंकरशेठ मारूती ढोणूक्षे (केरवडे) यांच्या हस्ते आबाजी वाईंगडे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. पहाटे चार वाजता पालखी सोहळा होणार आहे. सोमवार  १७ फेब्रुवारी 2020 रोजी देवाला श्रीफळ वाढवून यात्रेची सांगता होणार आहे.या निमित्त महाप्रसादाचेे आयोजन करण्यात आले आहे  भाविकांनी यात्रेचा लाभ घ्यावा , असे आवाहन देवस्थान कमिटी मार्फत करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment