ताणतणाव ठाळण्यासाठी निसर्गाशी एकरूप व्हा - डॉ. राजाराम गावडे - चंदगड लाईव्ह न्युज

15 February 2020

ताणतणाव ठाळण्यासाठी निसर्गाशी एकरूप व्हा - डॉ. राजाराम गावडे

ताण -तणाव व्यवस्थापन या विषयावर श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूर येथे बोलताना डॉ़. राजाराम गावडे, सोबत प्राचार्य एस. जी. पाटील, प्रा. रामदास बिर्जे, श्री. सुर्यवंशी आदी.
तेऊरवाडी / प्रतिनिधी
आजचा विद्यार्थी केवळ परिक्षार्थी बनत चालला आहे. गुणवत्ता वाढवण्याच्या नादात तो निसर्गापासून दुरावत चालला आहे. पालक, शिक्षक व समाज यांच्या प्रचंड अपेक्षा वाढल्या असून या अपेक्षा पूर्ण करताना विद्यार्थी अनेक समस्यांना सामोरे जात आहे. अभ्यासाच्या वेळापत्रकात गुरफटलेल्या या विद्यार्थ्यांची निसर्गाशी असणारी नाळ तुटल्याने अनेक प्रकारच्या ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे जर शालेय जीवनात वारंवार येणारा ताणातणाव टाळायचा असेल तर विद्यार्थ्यांनी निसर्गाशी एकरूप होण्याचे आवाहन डॉ. राजाराम गावडे यांनी केले.
अडकूर (ता. चंदगड) येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज येथे इयत्ता १२ वी `विद्यार्थांचा शुभेच्छा  समारंभ  व राष्ट्रीय बाल हक्क अधिकार संरंक्षण आयोग नवी दिल्ली आयोजित परीक्षा पर्व २.० बोर्ड परोक्षेस सामोरे जाताना ताण - तणाव व्यवस्थापन विद्यार्थी समुपदेशन` या विषयावर आयोजित कार्यक्रमात प्रमूख वक्ते म्हणून डॉ . गावडे बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य एस. जी. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे पूणे येथील लक्ष्य संस्थेचे संचालक विनोद कुराडे होते.
प्रा. व्ही. पी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. मेघा शिवनगेकर, रतन कांबळे, पुजा गावडे, काजल खोत, आश्विनी नाईक, एस. डी. पाटील, प्रा. रामदास बिर्जे यांनी विद्यार्थी -विद्यार्थिनीना शुभेच्छा दिल्या. विनोद कुराडे यांनी ताण -तणाव व्यवस्थापनावर मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मन, मेंदू आणि मनगटाच्या जोरावर जिवनात यशस्वी होण्यासाठी कष्ट करण्याचा सल्ला प्राचार्य श्री. पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाला व्ही. एन. सुर्यवंशी, एस. के. पाटील, बंकट हिशेबकर आदि मान्यवर व विद्यार्थी उपस्थित होते. आर. व्ही. देसाई यांनी सुत्रसंचालन केले. प्रा. एम. पी. पाटील यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment