कोवाड महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत वल्लभ पाटील "सर्वोदय श्री" चा मानकरी, शनिवारी पारितोषिक वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2020

कोवाड महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत वल्लभ पाटील "सर्वोदय श्री" चा मानकरी, शनिवारी पारितोषिक वितरण


कोवाड महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत " सर्वोदय श्री" चा मानकरी ठरलेला वल्लभ पाटील.
कोवाड / प्रतिनिधी
येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कोवाड चा वार्षिक क्रीडा महोत्सव 12 व 13 फेब्रुवारी 2020 रोजी संपन्न झाला. डॉ. व्ही. आर. पाटील व प्रा. एस. जे. पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयाचा ध्वज फडकवून स्पर्धेला सुरवात झाली. यावेळी क्रीडा शिक्षक प्रा.आर. टी.पाटील यांनी वैयक्तिक व सांघिक खेळ प्रकारात या स्पर्धा संपन्न झाल्याची माहिती दिली. उदघाट्न प्रसंगी डॉ. व्हि. आर. पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.
कोवाड महाविद्यालयातील शरीर सौष्ठव स्पर्धेत सहभागी झालेले स्पर्धक.
या स्पर्धेतील व वर्षातील गुणवंत खेळाडू, विद्यार्थी, शिक्षक व पुरस्कार विजेत्यांचे गौरव, सत्कार आणि विजेत्यांना प्रमाणपत्र व चषक शनिवारी 15 फेब्रुवारी  2020 रोजी होणाऱ्या पारितोषिक वितरण समारंभात गौरविण्यात येणार आहे. 14 फेब्रुवारी रोजी महाविद्यालय अंतर्गत "सर्वोदय श्री"  शरीरसौष्ठव  स्पर्धा घेण्यात आल्या. यासाठी रु 5000, रु 4000, रु 3000, रु 2000, रु 700, रु 500 व  चषक अशा स्वरूपात रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
क्रिडा स्पर्धेतील धावण्याच्या स्पर्धेतील क्षण.
0 ते 55 किलो,56 किलो ते 65 किलो आणि 66 किलो पासून पुढे या तीन गटात या स्पर्धा झाल्या. तिन्ही गटात मिळून एकूण 16 स्पर्धकांनी भाग घेतला होता. या तिन्ही गटातील पहिल्या तीन क्रमांकाच्या मानकरी ठरलेल्या सहा विजेत्यामध्ये "सर्वोदय श्री" किताबासाठी सरळ लढत होती. हाही स्पर्धकामध्ये अडतटीची लढत झाली.
कब्बडीतील अटीतटीच्या लढतीतील एक क्षण.
यामध्ये बी.एस.सी.भाग 1 चा विध्यार्थी वल्लभ रामचंद्र पाटील याने बाजी मारत आपले नाव "सर्वोदय श्री" किताबावर कोरले. द्वितीय क्र. अनील आनंद मोहनगेकर, कुदनूर B. Sc.II , तृतीय क्र.कपिल नागरदळेकर,कुदनूर B. Sc.I,चतुर्थ महेश धनगर राजगोळी  B. A. II, पाचवा संदिप पाटिल,कोवाड B. Sc II, सहावा राहूल जाधव,हुंदळेवाडी B.A. Il. हे ठरले. पर्यवेक्षक म्हणून अविनाश हुद्दार आणि संतोष जोशी यांनी काम पाहिले.सर्व विजेत्या स्पर्धकांना सर्वोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. ए. एस. जांभळे, प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील ,संस्थेचे संचालक शाहू फर्नांडिस, याकूब मुल्ला, बी. आर. पाटील तसेच या स्पर्धकांना रोख रक्कमच्या स्वरूपात पुरस्कार जाहीर केलेल्या दिग्विजय  पाटील, अमोल कोकितकर, दयानंद सलाम,विनायक भोगण, अविनाश हुद्दार, आर टी पाटील,कै के बी पाटील फौंडेशन, विश्वनाथ पाटील, संतोष जोशी आणि कल्लाप्पा हडलगेकर यांच्या हस्ते पूरस्कार देऊन सत्कार करण्यात आले.
लांब उडी स्पर्धा
शनिवारी 15 रोजी  वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न होत असून या कार्यक्रमाचे प्र.पाहुणे मा. प्रा. किसनराव कुराडे अध्यक्ष, शिवराज शिक्षण संकुल, गडहिंग्लज. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मा.डॉ. ए. एस. जांभळे अध्यक्ष सर्वोदय शिक्षण संस्था, कोवाड असून सदर कार्यक्रम हा सचिव एम. व्हि. पाटील, शिवाजीराव पाटील माजी. सहा. पोलीस उपयुक्त मुबंई, दै. सकाळ चे पत्रकार प्रा. ए. टी. पाटील आणि सर्वोदय शिक्षण संस्थेच्या सर्व पदाधिकारी,संचालक तसेच आजी माजी विध्यार्थी,माजी विध्यार्थी मंडळ च्या सर्व पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. 

त्याचबरोबर मराठी पत्रकार परिषदे कडून वसंतराव काणे राज्यस्तरीय आदर्श तालुका पत्रकार संघ म्हणून निवड झालेल्या 8 फेब्रुवारी रोजी अक्कलकोट,सोलापूर येथे झालेल्या कार्यक्रमात पुरस्कार स्विकारलेल्या चंदगड तालुका पत्रकार संघाचा सुध्या यावेळी सत्कार होणार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारीतेतील प्रतिनिधीला प्रत्येक वर्षीच्या होणाऱ्या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून आमंत्रित करणार असल्याची माहीती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. व्ही. के. दळवी यांनी दिली. तरी सर्वानी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांनी केले आहे.
(बातमी सौजन्य - संजय पाटील, कोवाड, बातम्या व जाहिरीतासाठी संपर्क, मो. 9921154385)

No comments:

Post a Comment