मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत कूट्रे याना "महात्मा जोतिबा फुले" समाज रत्न पुरस्कार जाहीर - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2020

मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत कूट्रे याना "महात्मा जोतिबा फुले" समाज रत्न पुरस्कार जाहीर

प्रशांत पांडूरंग कुट्रे
चंदगड / प्रतिनिधी
कडगाव (ता. भुदरगड) येथील  मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड, वीर भगतसिंह विदयार्थी परिषद,डाॅ.पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद यांच्या वतीने देण्यात येणारा 2020 चा "राष्ट्रपिता जोतिराव फूले" समाज भूषण  पुरस्कार मराठा सेवा संघाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत पांडूरंग कुट्रे (रा. केंचेवाडी, ता. चंदगड) यांना जाहिर झाला आहे. समाज हितासाठी सतत कार्य करणार्‍या बांधवांना हा पुरस्कार देण्यात येतो.
१९ फेब्रुवारी 2020 रोजी शिवजयंती रोजी कडगाव येथे सरपंच दिपकराव कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली शिवश्री. संजय शिंदे (उप जिल्हाधिकारी व  केंद्रीय कार्यकारीणी सदस्य  मराठा सेवासंघ ) शिवश्री डाॅ .राजीव चव्हाण, प्रदेशाध्यक्ष विश्वशाहिरी परिषद.शिवमती अलका भोईटे, पुणे विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड शिवमती सुषमा देसाई (प्राचार्या, ग्रामसेवक ट्रेनिंग सेंटर जि. प. कोल्हापूर) सचिव मराठा सेवा संघ. शिवश्री अश्विनकुमार वागळे (अभियंता महावितरण ) जिल्हाध्यक्ष..मराठा सेवासंघ शिवश्री अजय शिंदे (अधिक्षक विधी विभाग प्रमुख जि. प कोल्हापूर)कार्याध्यक्ष म.से. संघ शिवश्री.रुपेश पाटील, जिल्हाध्यक्ष संभाजी ब्रिगेड शिवश्री.डाॅ.राजीव चव्हाण प्रदेशाध्यक्ष विश्वशाहिरी अध्यक्ष मराठा सेवा संघ.शिवमती. चारुशिला पाटील जिल्हाध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड आदीच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार आहे .या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष शहाजी देसाई ,सुधाकर देसाई,अविनाश धबधबे यांनी केले आहे.

1 comment:

Unknown said...

Congratulations kaka

Post a Comment