माणसाने माणसाकडे डोळसपणे पहावे - चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार, जनजागृती काव्यसंग्रहाचे प्रकाशन - चंदगड लाईव्ह न्युज

14 February 2020

माणसाने माणसाकडे डोळसपणे पहावे - चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार, जनजागृती काव्यसंग्रहाचे प्रकाशन

चंदगड येथे चंदगड तालुका पत्रकार संघाच्या प्रयत्नातून मुक्ताबाई नावळे यांच्या जनजागृती पुस्तक प्रकाशन कार्यक्रमावेळी बोलताना चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार.
चंदगड / प्रतिनिधी
शिक्षीत असुनही अजून आपल्याला आपल्या ज्ञानाची, संस्कृतीची,रूढी परंपरेची जाणीव नाही. थोडसं शिकलो  की आपल्या डोळ्यावर अहंकाराची झालर चढते. समाजातील एखादा माणूस वरून काय दिसतो त्यावरून आपण त्याचे मूल्यमापन करत असतो, पण हे चुकीचे असून आपण समजतो त्याही पेक्षा त्याच्याकडे वेगळी गुणवत्ता असते. म्हणून माणसाने माणसाकडे डोळसपणे पहावे असे प्रतिपादन चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार यांनी केले.
चंदगड येथे मुक्ताबाई नावळे यांच्या जनजागृती काव्यसंग्रहाचे प्रकाशन करताना चंदगडचे न्यायाधीश ए. सी. बिराजदार, शाहू कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंग घाटगे, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ
चंदगड येथे पंचायत समिती  सभागृहात आयोजित केलेल्या कवयित्री मुक्ताबाई नावळे यांच्या "जनजागृती " या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकुमार ढेरे होते. प्रारंभी उदयकूमार देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी न्यायाधीश ए. सी. बिराजदार,शाहू कारखान्याचे अध्यक्ष तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंग घाटगे, माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, जि. प. सदस्य सचिन बल्लाळ यांच्या हस्ते  पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. न्यायाधीश श्री. बिराजदार पूढे म्हणाले, ``शिक्षणाचा आणि ज्ञानाचा संबंध फार कमी आहे. ज्ञानाची पूजा सर्वानीच केली पाहिजे, सदॄविवेक माणसाच्या मनात येणारे भाव म्हणजे भगद्गिता होय.`` यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष  समरजित घाटगे,माजी मंत्री भरमुआण्णा पाटील, नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर, अखलाक मूजावरयानी मनोगत व्यक्त केली.


No comments:

Post a Comment