![]() |
अनिकेत चव्हाण |
चंदगड ते चंदगड फाटा दरम्यान असलेल्या चंदगड फाटा (ता. चंदगड) येथील पोलिस वसाहतीसमोरील मदार वॅशिंग सेंटरजवळ क्रुझर व दुचाकी यांच्या समोरसमोर धडक होवून झालेल्या अपघातात अनिकेत प्रकाश चव्हाण (वय-21, रा. बिद्रेवाडी, ता. गडहिंग्लज) हा युवक ठार झाला. सायंकाळी साडेसात वाजता हा अपघात घडला.
पोलिसांतून मिळालेली माहीती अशी – चंदगड फाट्यावरुन क्रुझर गाडी (केए-37, ए 4703) हि चंदगडकडे जात असताना पोलिस वसाहतीसमोर मदार सर्व्हिसिंग सेंटरजवळ दुचाकी व क्रुझरची समोरसमोर धडक होवून झालेल्या गंभीर अपघात झाला. यामध्ये दुकाचीस्वार अनिकेत चव्हाण हा गंभीर जखमी झाला होता. त्याला तातडीने उपचारासाठी चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयात दाखल करण्यात आले. तेथे डॅक्टरांनी तपासले असता तो मयत झाल्याचे सांगितले. घटनेची नोंद चंदगड पोलिसात झाली असून महादेव पवार तपास करत आहेत.
No comments:
Post a Comment