चंदगड तालुक्यातील पाच गावांमध्ये 3 ते 7 मार्चला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2020

चंदगड तालुक्यातील पाच गावांमध्ये 3 ते 7 मार्चला स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे आयोजन


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यामध्ये शिवशक्ती स्थळ (शिवस्मारक) व वेंगरुळ (ता. भुदरगड) येथील सव्यासाची गुरुकुलम् यांच्या संयुक्त विद्यमाने 3 ते 7 मार्च 2020 या कालावधीत भारतीय व्यायाम प्रशिक्षण दिले जाणार आहे. महिला दिनाच्या निमित्ताने हा कार्यक्रम होणार आहे.
चंदगड तालुक्यातील चंदगड, कळसगादे, नांदवडे, कानुर, इब्राहिमपूर या पाच गावांमध्ये दररोज सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत प्रशिक्षण दिले जाणार आहे. या पाच गावांपैकी दररोज एका गावामध्ये सव्यासाची गुरुकुलम्चे विद्यार्थी प्रात्यक्षिक सादर करणार आहेत. चंदगड येथे आठ मार्चला महिला दिनाच्या निमित्ताने शिवशक्ती स्थळाजवळ सकाळी आठ ते दहा या वेळेत मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक होईल. यावेळी सव्यसाची गुरुकुलम्चे विद्यार्थी शिवकालीन शस्त्र कौशल्य सादर करतील. सायंकाळी चार ते सहा या वेळेत सव्यसाची गुरुकुलमच्या प्रीती जाधव महिलांची संवाद साधणार आहेत. महिलांना स्वरक्षणाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले जाईल. या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवशक्तीस्थानचे अध्यक्ष अनिकते घाटगे यांनी केले आहे. 

No comments:

Post a Comment