बेळगावच्या केएलई रुग्णालयामध्ये महात्मा फुले जीवन आरोग्यदायी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार संभाजीराजे - चंदगड लाईव्ह न्युज

02 March 2020

बेळगावच्या केएलई रुग्णालयामध्ये महात्मा फुले जीवन आरोग्यदायी योजना राबविण्यासाठी प्रयत्न करणार - खासदार संभाजीराजे

कूदनूर येथे विकासकामांचा शुभारंभ
 कुदनूर (ता. चंदगड) येथे तीस लाख रुपयांच्या विकास कामाचा शुभारंभ करताना खासदार संभाजीराजे, शेजारी सरपंच शालन कांबळे, शहापूरकर, उपसरपंच कोकीतकर  आदी.
चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यासह सिमाभागातील नागरिकांना बॆळगाव येथील केएलई हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र सरकारची महात्मा फुले जीवन आरोग्यदायी योजनेचा लाभ मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे खासदार संभाजी राजे छत्रपती यानी सांगितले.  कुदनूर (ता. चंदगड) येथे खासदार फंडातील तीस लाख रूपये विकासाकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच शालन कांबळे होत्या.
प्रारंभी प्रास्ताविक प्रा. एस. एम. शहापूरकर यांनी विकासात राजकरण न आणता निधी देण्यात खास संभाजी राजे याचे कार्य आदर्शवत असल्याचे सांगितले. खासदार संभाजीराजे म्हणाले, ``चंदगड तालुका करवीर संस्थानमध्ये नसतानाही चंदगडच्या जनतेने छत्रपती घरण्यावर मनापासुन प्रेम केले आहे. जिल्ह्याच्या ठिकाणापासून दुर असलेल्या चंदगड तालुक्यातील नागरिकांना अनेक सोयी सवलती मिळत नाहीत, हि वस्तुस्थिती आहे. बेळगावतील केएलई हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जीवन आरोग्यादायी योजनेचा लाभ देण्यासाठी केएलईचे अध्यक्ष खासदार प्रभाकर कोरे यांची भेट घेऊन विनंती करणार आहे. या साठी प्रसंगी केंद्रीय आरोग्य विभागाचे सहकार्य घेऊ असे सांगितले.``  
प्रारंभी सांस्कृतिक सभागृह व अंतर्गत रस्ता विकासकामांचा शुभारंभ खासदार संभाजी राजे यांच्या हस्ते झाला. यावेळी उपसरपंच नामदेव कोकीतकर,दिग्विजयसिंह जाधव,बाळासाहेब कोकीतकर, नगरसेवक सचिन नेसरीकर,बाळगोंडा पाटील,बाबूराव जाधव,परसू निर्मळकर,सूमन आंबेवाडकर,नंदा शहापूरकर,भारती नौकूडकर,सरस्वती हडलगेकर,भारती सूतार,अजंना तलवार ,अनिल कांबळे, सूरज माने,प्रविण पवार नंदकुमार ढेरे, विश्वास निंबाळकर, सत्याप्पा जपाते,प्रकाश कसलकर,मारूती आंबेवाडकर नामदेव सूतार  आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.आभार उपसरपंच नामदेव कोकीतकर यानी मानले.





No comments:

Post a Comment