![]() |
केंद्राच्या तयारीसंदर्भात पर्यवेक्षकाना मार्गदर्शन करताना केंद्र संचालक एस .जी .पाटील , सोबत व्ही .के. फगरे , श्रीमती एस .ए. बागे |
अडकूर / प्रतिनिधी
मंगळवारपासून 3 मार्च 2020 रोजी पासून सुरू होत असलेल्या माध्यमिक शालांत बोर्ड परीक्षा ( एस .एस.सी. ) ची अडकूर ता . चंदगड येथील श्री शिवशक्ती हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज या केंद्रावरील बैठक व्यवस्था पूर्ण झाली आहे . या केंद्रावर परिसरातील सहा माध्यमिक शाळामधील 2४९ नियमित विद्यार्थी परीक्षा देणार आहेत . तर काही पेपरना रिपीटर विद्यार्थी असणार आहेत .आज या केंद्रावरील सर्व बैठक व्यवस्था सुसज्ज ठेवण्यात आली आहे . गेल्या दहा वर्षापासून अत्यंत चांगल्या प्रकारे या केंद्राचे कामकाज चालू आहे . या केंद्रावर श्री शिवशक्ती हायस्कूल अडकूरचे -७८ विद्यार्थी , श्री भावेश्वरी विद्यालय आमरोळीचे- ४० , श्री चाळेबा माध्यमिक विद्यालय सातवणे -५६ , न्यू हायस्कूल अलबादेवी -१७ , श्री शरदचंद्रजी माध्यमिक विद्यालय बुझवडे -३९ तर कर्मिल इंग्लिश मेडिअम स्कूल अडकूर -१९ असे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत .गैरप्रकाराना आळा घालण्यासाठी स्थानिक दक्षता कमिटी नेमण्यात आली असून खास भरारी पथकही नजरही केंद्रावर आहे . आतापर्यंतच्या मागील दहा वर्षात या केंद्राचे कामकाज चांगले असल्याने एकही गैरप्रकार किंवा कॉपी प्रकरण झाले नाही . आताही असेच केंद्र राहणार असून केंद्राची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती केंद्र संचालक एस .जी. पाटील , सहाय्यक केंद्र संचालक व्ही .के. फगरे यानी दिली आहे.
No comments:
Post a Comment