नेसरी / प्रतिनिधी
मुले ऐकत नाहीत, सारखे टीव्ही पाहतात , मोबाईलवर गेम खेळतात , चिडखोर व हटृी स्वभाव, जेवणाकडे दुर्लक्ष करून सतत फास्ट फूडची मागणी करतात , हुशार आहे पण अभ्यास करत नाही अशा समस्याच्या निराकरणासाठी लक्ष्य एज्यूकेशनल सर्विसेस पूणे यांच्या मार्फत पालकांसाठी नेसरी ता . गडहिंग्लज येथे 3 मार्च रोजी सकाळी ११ वाजता मोफत मार्गदर्शन सेमिनार ठेवण्यात आले आहे .
मूलांच्या बाबतीत अनेक कमी-अधिक प्रमाणात प्रत्येक घरांमध्ये समस्या आहेतच. आणि म्हणून अशा समस्यांचे निवारण करण्याकरिता मोठ्या शहरांमधील पालक रु.५००० ते ८००० फी भरून अशा सेमिनार मध्ये घेऊन प्रशिक्षण घेत आहेत. मात्र वरील समस्या लहान शहरांमध्ये व प्रत्येक गावातील प्रत्येक घरात या समस्या आहेतच आणि इच्छा असूनही इतकी फी भरून प्रशिक्षण घेणं हे ग्रामीण भागातील सर्व पालकांना शक्य होत नाही .याकरिता नेसरी परिसरातील सर्व पालकांसाठी "प्रोग्रेसिव्ह इंग्लिश मिडीयम हायस्कूल" व पुणे येथील "लक्ष एज्युकेशनल सर्विसेस" या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हा सेमिनार विरशैव समाज मंगल कार्यालय नेसरी येथे मंगळवार दि ३ मार्च रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी या सुवर्ण संधीचा नेसरी परिसरातील सर्व पालकांनी आवश्य लाभ घ्यावा असे आवाहन विनोद कुराडे यानी केले आहे .
No comments:
Post a Comment