![]() |
पाटणे फाटा (ता.चंदगड) येथे चिकन सेंटर दुकानात 40 रुपये किलो चिकन असल्याचे फलक उंचावूनदाखविताना सेंटरमालक. |
कार्वे / प्रतिनिधी
दगडआज सर्वत्र होळीचा सण साजरा करतअसताना पारंपारिक पद्धतीने धुळवड या दिवशी चंदगड तालुक्यात सगळीकडे मटणाचा बेतआखला जातो. मटन खाणारे चिकन वर आपली तहान भागवत असतात. मात्र कोरोना व्हायरस यारोगाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन लोकांनी चिकन खाण्याकडे आपले दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन होणाऱ्या बॉयलर कोंबड्या पोल्ट्रीमध्ये पडून आहेत. त्यामुळे चिकन विक्रीवर त्याचा परिणाम जाणवत आहे. पोल्टी व्यावसायीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. चिकनमुळे कोरोना होतो हा गैरसमज असल्याचे अनेक डॉक्टरांचे म्हणने आहे.
उत्पादन जास्त आणि खाणाऱ्यांची संख्याकमी झाल्याने आज पाटणे फाटा येथील बादशाह चिकन सेंटरमध्ये 40 रुपये किलो याप्रमाणे चिकन तर पन्नास रुपयाला एक कोंबडी आणि खासऑफर मध्ये दोनशे रुपयाला पाच कोंबड्या अशी खवय्यांसाठी आज बादशाह चिकन सेंटर समोरपाटी लावण्यात आली होती. मात्र दररोज पन्नास ते साठ हजार रुपये किमतीचे चिकनविकणारे बादशाह चिकन सेंटर वाल्यांनाही चिकन खाणाऱ्यांनी आज रोजच्या प्रमाणे म्हणावातसा प्रतिसाद दिला नसल्याचे चित्र तालुक्यात दिसत होते. काही पोल्ट्री व्यावसायिकआपल्या कोंबड्या थेट कंपनीकडे न देता गावागावातून गाडी करत दोनशेला पाच अशी ऑफरठेवत कोंबडा विकण्याचा प्रयत्न केला. भविष्यात कोंबड्या खाता येतील म्हणून काहींनीकोंबड्या खरेदी करुन ठेवल्या आहेत. त्यामुळे गावागावातून फिरणाऱ्या पोल्ट्रीव्यावसायिकयांचा आज थोड्या प्रमाणात व्यापारही झाल्याची चित्र स्पष्ट होत होते.
No comments:
Post a Comment