नगरपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यावर एकमत, चंदगड नगरपंचायत बैठक - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2020

नगरपंचायतीची नवीन प्रशासकीय इमारत बांधण्यावर एकमत, चंदगड नगरपंचायत बैठक


चंदगड / प्रतिनिधी
चंदगड नगरपंचायतीची पहिली सर्वसाधारण सभा नगराध्यक्षा सौ. प्राची काणेकर यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीत झाली.
मुख्याधिकारी अभिजित जगताप यांनी प्रास्ताविक केले. यावेळी नगराध्यक्षा सौ.  काणेकर यानी गावचा विकास साधण्यासाठी  सर्वाच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. यावेळी गावच्या विकासाच्या अनुषंगाने सर्व नगरसेवकांनी सकारात्मक मते मांडली. यावेळी नगरपंचायतीच्या प्रशासकीय इमारत बांधकामासाठी सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. आमदार राजेश पाटील, हसन मुश्रीफ यांची ग्रामविकासमंत्रीपदी व सतेज पाटील यांची गृहराज्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव करण्यात आला. चंदगडचे सुपुत्र व सार्वजनिक बांधकाम उपविभाग चंदगडचे अभियंता राजू मुल्ला यांना मिळालेल्या इंजिनिअरिंग क्षेत्रातील पुरस्काराबद्दल शाल, श्रीफळ देऊन नगराध्यक्षा प्राची काणेकर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी  नगरसेवक सचिन नेसरीकर, अॅड. विजय कडुकर, झाकीर नाईक, दिलीप चंदगडकर, अभिजित गुरबे, मुमताज मदार, नुरजहाँ नाईकवाडी, मेहताब नाईक, नेत्रदीपा कांबळे, आनंद हळदणकर अनुसया दाणी, अनिता परीट, माधुरी कुंभार, रोहित वाटंगी, शिवानंद हुंबरवाडी, संजीवनी चंदगडकर, प्रमिला गावडे, संजना कोकरेकर उपस्थित होते. उपनगराध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment