कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
माणगाव (ता. चंदगड) येथील रहिवाशी डॉ. विलास श्रीधर जोशी यांचे शुक्रवार दिनांक २९/२०२६ रोजी रात्री ८.३० वाजता वयाच्या ८० व्या वर्षी माणगाव येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर शनिवारी दि. ३० सकाळी १०.०० वाजता माणगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वैशाली, डॉक्टर पराग, आशिष व संतोष हे तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. गेल्या काही वर्षांपासून ते अर्धांग वायूमुळे आजारी होते.
सुमारे ५५ वर्षांपूर्वी कोवाड येथील डॉक्टर आर. एस. जोशी व त्यांचे बंधू डॉक्टर विलास जोशी यांनी कोवाड व माणगाव परिसरात रुग्णसेवा सुरू केली. त्या काळात अत्यंत दुर्गम असलेल्या या परिसरात दोन्ही जोशी बंधूंनी केलेली रुग्णांची सेवा जुने लोक अजून विसरलेले नाहीत. डॉक्टर आर. एस. जोशी कोवाड येथून काही वर्षांपूर्वी अन्यत्र स्थलांतरित झाले असले तरी डॉक्टर विलास जोशी यांनी तसेच त्यांचे सुपुत्र यांनी रुग्णांची सेवा अखंडितपणे सुरू ठेवली आहे. डॉक्टर जोशी यांच्या जाण्यामुळे माणगाव परिसरातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

No comments:
Post a Comment