हलकर्णी फाट्यावर लघुशंकेसाठी मुतारीची गरज, ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2020

हलकर्णी फाट्यावर लघुशंकेसाठी मुतारीची गरज, ग्रामपंचायतीने लक्ष देण्याची गरज


दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
हलकर्णी फाटा (ता. चंदगड) येथील वाढती बाजारपेठ पाहता या ठिकाणी लघुशंकेसाठी मुतारी नसल्याने अनेकांची गैरसोय होते. विशेषत: महिलांना या गोष्टीमुळे मोठी अडचण होते. मात्र काहीवेळा एखाद्या झाडाचा आडोसा घ्यावा लागत आहे. चंदगड तालुक्याच्या केंद्रस्थानी असणाऱ्या या ठिकाणी रोज हजारो लोकांची ये-जा असते. दौलत शेतकरी सहकारी साखर कारखाना, महाविद्यालय, बँका, पतसंस्था तसेच मोठी बाजारपेठ आहे. त्यामुळे दररोज लाखोंची उलाढाल व हजारो नागरिकांची ये-जा असते. बऱ्याचशा कामासाठी लोक या ठिकाणी येतात. मात्र मुतारीची सोय नसल्याने अनेकांची गैरसोय होते. एखाद्या झाडाचा आडोसा घ्यावा लागतो अन्यथा भिंतीचा. या कारणामुळे अनेकदा लहान-मोठे वाद होतात दिसतात. हलकर्णी ग्रामपंचायतीने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देवून त्वरीत हा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. 


No comments:

Post a Comment