कोवाड (ता. चंदगड) येथे आकाशात साचलेले काळे ढग. |
कोवाड / प्रतिनिधी
कोवाडसह परिसरात आज सायंकाळी 6 नंतर अचानक काही काळानंतर वातावरणात बदल होऊन आभाळ पूर्णतः गच्च झाले आणि पावसाने काही वेळा साठी का असेना आपली हजेरी लावली.दिवसभर वातावरणात कमालीची उष्णता हि जाणवत होती. आणि अर्ध्या तासात संपूर्ण वातावरण बदलून सगळीकडे अंधारी आली आणि त्याबरोबरच पाऊस देखील पडला.कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर अश्या बदलत्या वातावरणामुळे नागरिकांसह प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत मात्र आणखीनच भर पडलेली आहे.कारण या अश्या वातावरणाच्या बदलात किरकोळ सर्दी खोकल्याचे रुग्ण हे वाढण्याची शक्यता असल्याने आता सर्वाना अधिकच सावध राहण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण कोरोना च्या आजच्या परिस्थितीत पावसात भिजून किरकोळ सर्दी खोकला जरी झाला तरी नागरिकांच्या मानसिकतेवर परिणाम होण्याची दाट शक्यता असून सर्वांनी पावसात न भिजता आपापल्या आरोग्याची काळजी घेण्याची आवाहन हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. प्रसन्न चौगुले यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment