चंदगड तालुक्यात मेघ गर्जनेसह पावसाचा शिडकावा - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2020

चंदगड तालुक्यात मेघ गर्जनेसह पावसाचा शिडकावा

चंदगड / प्रतिनिधी
शहरासह तालुक्याच्या विविध भागात आज सायंकाळी साडेसहानंतर पावसाच्या सरींचा शिडकाव झाला. गेले दोन दिवस हवेतील उष्म्यांच्या प्रमाणात वाढ झाली होती. आज दुपारनंतर आकाशात काळे ढग दिसत होते. त्यामुळे पाऊस येण्याची चिन्हे होती. त्यामुळे सायंकाळी साडेसहानंतर तालुक्यातील अनेक गावात मेघगर्जनेसह पावसाचा शिडकाव झाला. काही वेळ वातावरण थंड झाल्याने नागरीकांना उष्म्यापासून दिसाला मिळाला. 
चंदगड तालुक्यातील शिरगाव, नागनवाडी, कोनेवाडी, दाटे, कोवाड, माणगाव,  डुक्करवाडी, कारवे, ढोलगरवाडी, बसर्गे परिसरमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजलेनंतर अचानकपणे काहीकाळ हवामान ढगाळ होऊन पावसाचा शिडकावा झाला. करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बुधवारी सायंकाळी झालेल्या ढगाळ वातावरणामुळे नागरिकांसह प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या चिंतेत भर घातली आहे. चंदगड तालुक्यात अद्यापपर्यंत एकही करोनाबाधित रुग्ण नसला तरी अशा दूषित वातावरणात कोणतेही विषाणू पसरण्याचा तसेच ज्येष्ठांना आणि बालकांना सर्दी होण्याचे शक्यता अधिक असल्याने नागरिक अधिकच धास्तावले आहेत. तालुक्यातील काही भागांत अल्पसा शिडकावा होऊन गेल्याने तापलेल्या जमिनीतील उष्णतादेखील बाहेर पडली. त्यामुळे दुपारच्या कडक उन्हानंतर सायंकाळी हवेत गारवा पसरला होता. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत नागरिकांनी आपल्या मुलांना पावसाच्या पाण्यापासून दूर ठेवा. अधिकाधिक वेळ घरातच थांबून मुलांचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment