कालकुंद्री ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2020

कालकुंद्री ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्कचे वाटप


कालकुंद्री (प्रतिनिधी) 
कोरोणाला आळा घालण्यासाठी कालकुंद्री ग्रामपंचायतनेही एक पाऊल पुढे टाकत गावातील सर्व नागरिकांना मास्क चे वाटप करण्याचे ठरवले आहे. ग्रामपंचायत मार्फत आणलेल्या कपड्यापासून मास्क शिवून देण्यासाठी गावातील सुमारे २० पेक्षा अधिक महिला टेलर पुढे आल्या आहेत.  मास्क वितरणचे काम सध्या सुरू आहे. कोरोना जनजागृतीसाठी सरपंच विनायक कांबळे, उपसरपंच सुरेश नाईक ग्रामसेवक व्ही. बी. भोगण सर्व सदस्य व कर्मचारी, पोलीस पाटील संगीता कोळी, आशा, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचारी झटत आहेत. मास्क तयार करण्यासाठी लागणारे साहित्य खरेदीसाठी जी. एस. पाटील, शिवाजी क. पाटील, विनोद अ. पाटील, पांडुरंग कोकीतकर, अबुल मोमीन, एन. के. पाटील आदी अनेक देणगीदार  सहकार्यासाठी पुढे आले आहेत.

No comments:

Post a Comment