![]() |
आमदार राजेश पाटील व प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी चंदगड येथील ग्रामीण रुग्णांलयाला भेट देवून कोरोना व्हायरस उपाययोजनाबाबत सुचना दिल्या. |
चंदगड / प्रतिनिधी
देशात धुमाकुळ घालत असणाऱ्या कोरोना प्रश्नी चंदगडचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी चंदगड आरोग्य केंद्राला भेट देूवून कोरोना रोगासंदर्भात केलेल्या उपाय योजनेसंदर्भात वैदयकिय विभागाशी चर्चा केली.
आमदार राजेश पाटील यांनी तहसिलदार कार्यालयात प्रशासनाशी कोराना संदर्भात चर्चा केली. यानंतर प्रांताधिकारी विजया पांगारकर, चंदगडचे तहसिलदार अशोक रणवरे, डॉ़. सुहास साने यांच्याशी रुग्णांलयातील कोरोना संदर्भात कोणात्या प्रकारची तयारी केली आहे, याची सविस्तर माहिती घेऊन सुचना देण्यात आल्या. याबरोबरच तालुक्यात बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची माहिती तात्काळ आरोग्य विभागाला देण्यात यावी, शासनाकडून देण्यात येणाऱ्या सर्व सूचनांचे पालन ग्रामस्थ व प्रवाशांनी काटेकोरपणे करावे, कोणत्याही अफवा न पसरवता प्रशासनाला सहकार्य करण्याचे असे आवाहनही यावेळी आमदार पाटील यांनी केले. अभय देसाई, प्रविण वाटंगी, प्रविण गुडुळकर, एस. एल. पाटील यावेळी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment