तेऊरवाडी / प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पूणे च्या नऊ विभागीय मंडळामार्फत माध्यमिक शालान्त परिक्षा (१० वी बोर्ड पारिक्षा) ३ मार्च ते २३ मार्च पर्यंत आयोजित केली आहे. महाराष्ट्रात सध्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात चालू असल्याने सोमवार दि २३ मार्च 2020 रोजी होणारा १० वी समाजशास्त्र विषयाअंतर्गत येणारा भूगोल - २ या विषयाचा पेपर पु़ढे ढकलण्यात आला आहे. मंडळाच्या पूणे, नागपूर , औरंगाबाद , मुंबई , कोल्हापूर , अमरावती , नाशिक , कोकण , लातूर या नऊ विभागामार्फत सोमवारी होणारा भूगोल विषयाचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. ३१ मार्च नंतर यावर निर्णय घेतला जाणार आहे. याबरोबरच दिव्यांग विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेली कार्यशिक्षण विषयाची परीक्षा, आऊट ऑफ टर्नच्या सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षाबाबतचे सुधारित नियोजन लवकरच जाहिर करण्यात येणार असल्याचे राज्य मंडळाचे सचिव डाॅ. अशोक भोसले यानी सांगीतले आहे.दहावीचा शेवटचा पेपर पुढे ढकलल्याने विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
No comments:
Post a Comment