कोवाड परिसरातील किणी- कर्यात भागात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद - चंदगड लाईव्ह न्युज

22 March 2020

कोवाड परिसरातील किणी- कर्यात भागात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद

नेहमी गजबजलेल्या कोवाड (ता. चंदगड) येथील बाजारपेठेत शुकशुकाट होता.
कोवाड ( प्रतिनिधी )  
जगभरात कोरोनाचा कहर सुरु असतानाच भारतात हि कोरोना बाधित रुगणांच्या संख्येत वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर आज देशभरात सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत देशाचे पंतप्रधान नरेद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आहे. संपूर्ण राज्यभरातून नागरिकांनी सकाळ पासूनच 100 % प्रतिसाद दिला आहे. नागरिकांच्यामध्येही आजच्या परिस्थितीचे गांभीर्य दिसून आल्याचं आजच्या बंदच्या घटनेने दिसत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले होते. त्यामुळे सकाळपासून बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. चंदगड तालुक्यातील  किणी -कर्यात भागातील सर्वच गावातून शंभर टक्के प्रतिसाद मिळत आहे. नेहमी गजबजलेली असणारी कोवाड बाजारपेठ महापुराच्या घटनेनंतर दुसऱ्यांदा ठप्प झाल्याची दिसत आहे. केवळ पक्षांचा आवाज ग्रामीण भागात ऐकायला मिळत आहे.
शनिवार (ता. 21) परिसरातील सर्व ग्रामपंचायतींनी ध्वनिप्रक्षेपकाच्या माध्यमातून सर्व ग्रामस्थांना सुचना  दिल्या होत्या.  आज सकाळी बरोबर सात वाजल्यापासून कोवाड परिसरातील तेऊरवाडी, दुंडगे, निट्टूर, कुदनुर, किणी, कालकुंद्री, कागणी,  राजगोळी, म्हाळेवाडी , माणगाव आदि गावातील सर्वच दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. कोवाडमध्ये तर अगदी चहाच्या टपरीपासून ते अत्यावश्यक सेवा असणारी दुकांने पण बंद ठेवण्यात आली आहेत. ग्रामस्थानी दिवसभराच्या कामाला ब्रेक देवून घरीच राहणे पसंत केले. आरोग्य विभाग,पोलीस प्रशासन आणि ग्रामपंचायतीने ही चांगले प्रबोधन केल्याने या कर्फ्यूला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

No comments:

Post a Comment