मार्च मधील कर्ज वसूलीला स्थगिती द्यावी, कर्जदारांची मागणी - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2020

मार्च मधील कर्ज वसूलीला स्थगिती द्यावी, कर्जदारांची मागणी

चंदगड  / प्रतिनिधी 
राज्यात कोरोना सारख्या महाविषाणुचा फैलाव जोरात सुरु आहे . कोरोनाच्या संकटाचा सामाना महाराष्ट्रातील सर्व नागरीक करत आहेत . सरकारने लॉकडाऊन सारखा मोठा निर्णय घेतला . त्याचा परिणाम संघटीत व असंघटीत कामगारांच्या पगारावर होणार आहे . काही कुटुंबाची  अवस्था दिवसभर राबल्याशिवाय संध्याकाळी चुल पेटत नाही . छोटे - छोटे व्यवसायीक मासिक हप्त्यावर उभे आहेत . पण लॉकडाऊनमुळे सर्वसामान्याची हालत खराब झाली आहे . त्यामुळे गाडी , घरबांधणी,शेतीसाठी  काढलेल्या कर्जाचे हप्ते , सोसायटीचे हप्ते दोन ते तीन महिन्यामध्ये भरणे अवघड  आहे .त्यामुळे कर्जापोटी भरण्यायार्या हप्त्त्त्त्याना तीन महिने वाढीव मुदत मिळावी अशी मागणी कर्जदारांंकडून होत आहे . चंदगड तालुक्यात लहान - मोठे बरेच व्यवसाय - उद्योगधंदे कार्यरत आहेत .हे व्यवसाय -उद्योगधंदे नॅशनल बँक , जिल्हा बँक , नागरी पतसस्थां , फायनान्स कपंनीतुन कर्ज काढुन सूरू आहेत . जानेवारी महीन्याच्या शेवटच्या आठवड्यापासुन सर्व बँक व पतसंस्थाची मार्च एडिंगची वसुली सुरु होते . त्यामुळे सर्वत्र लगबग सुरू असते पण जगाबरोबर देशावर आलेल्या कोरोना  संकटामुळे सर्व अर्थिक स्थिती कोलमडली  आहे . चंदगड तालुक्यावर देखिल या कोरोनाचा परीणाम झाला आहे .अगोदरच काजु व्यवसायिकांना व्यापाऱ्यांनी फसवले आहे.यावेळी मार्च एडिंग मध्ये कर्जाचे हप्ते भरायचे कसे हा मोठा प्रश्न आहे .अचानक ओढवलेल्या ह्या संकटामुळे तालुक्यातील सर्व व्यापारीवर्ग हवालदिल झाला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कर्ज वसूलीला स्थगिती देऊन कर्जाचे हप्ते भरण्यास मुदत वाढवून द्यावी,  त्याचबरोबर व्याजात सवलत मिळावी अशी मागणी कर्जदार व्यापारी वर्गातुन होत आहे .

No comments:

Post a Comment