चंदगड तालुक्यात खासगी दवाखाने बंद, मेडिकल सुरू. नागरिकांचे हाल, सरकारी दवाखान्यावर ताण - चंदगड लाईव्ह न्युज

27 March 2020

चंदगड तालुक्यात खासगी दवाखाने बंद, मेडिकल सुरू. नागरिकांचे हाल, सरकारी दवाखान्यावर ताण


चंदगड / प्रतिनिधी 
कोरोनाच्या धास्तीने चंदगड तालूक्यात सर्वांनीच खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे.मात्र खेड्यातील  नागरिकांचे देवदूत बनलेल्या खासगी डाॅक्टरनी आपले दवाखाने बंद केल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.दवाखाने बंद मात्र मेडिकल सूरू आहेत.  याबाबत  तहसिलदार विनोद रणवरे यांच्या कडे नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत.खासगी दवाखाने बंद ठेऊ नये असा जिल्हाधिकारी यानी आदेश पारित केला असतानाही चंदगड तालूक्यातील खासगी डाॅक्टरानी मात्र बिनधास्त पणे दवाखाने बंद ठेवले आहेत. काही डाॅक्टरयानी तर दवाखान्यासमोर दवाखाने 31मार्च पर्यंत बंद असल्याच्या पाट्या लावल्या आहेत. कोरोना रोगाचा प्रसार थांबवण्यासाठी सरकार प्रत्येक आघाडीवर कसोशीने प्रयत्न करत असताना खासगी डाॅक्टर रूग्ण तपासण्यास नकार देत आहेत.त्यामुळे सर्व रूग्ण प्राथमिक आरोग्य केंद्राकडे जात असल्याने या प्राथमिक आरोग्य केंद्रावर ताण पडत आहे. एरव्ही गावपातळीवर सेवा देणार्या या खासगी डाॅक्टरावर प्रशासन काय कारवाई करणार का ?अशी विचारणा नागरिकातून होत आहे.

No comments:

Post a Comment