कोवाड येथील व्यापारी सिकंदर काडगांवकर यांच्याकडून नागरीकांना सातशे मोफत मास्कचे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2020

कोवाड येथील व्यापारी सिकंदर काडगांवकर यांच्याकडून नागरीकांना सातशे मोफत मास्कचे वाटप


कोवाड / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभमीवर सर्वत्र मास्कची मागणी वाढली आहे. पण मास्कची टंचाई निर्माण झाल्याने चढ्याभावाने काही ठिकाणी मास्कच्या विक्रीचे प्रकार होत आहेत. त्यामुळे कोवाड (ता. चंदगड) येथील सिकंदर काडगांवकर या कापड व्यापाऱ्यांने ७०० कापडी मास्क मोफत दिले आहेत. साध्या मास्कनेही कोरोनापासून बचाव करता येत असल्याने कांडगावकर यांनी स्वतःच्या दुकानात कापडी मास्क तयार करून लोकांना मोफत पुरविण्याचा संकल्प केला. चार दिवसात त्यानी सातशे मास्क तयार केले. तयार केलेले मास्क तंटामुक्त समिती, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलिसांच्याकडे जाऊन वितरीत केले आहेत. यावेळी कल्लापा वांद्रे, रणजित भातकांडे, जोतिबा आडाव उपस्थित होते. जास्तीत जास्त लोकांना मास्क मिळावेत यासाठी अजूनही मास्क तयार करुन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

No comments:

Post a Comment