कोरोना आपत्ती निवारणासाठी राज्यातील ६५हजार अधिकारी जमा करणार दोन दिवसाचा पगार, - चंदगड लाईव्ह न्युज

26 March 2020

कोरोना आपत्ती निवारणासाठी राज्यातील ६५हजार अधिकारी जमा करणार दोन दिवसाचा पगार,

मुख्यमंत्री निधीतून जमा होणार चाळीस कोटी जमा
विनोद देसाई, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघ
नंदकुमार ढेरे / चंदगड प्रतिनिधी
कोरोना आपत्ती निवारणासाठी राज्यातील 65हजार  राजपत्रित अधिकारी दोन दिवसांचा पगार मुख्यमंत्री निधीतून जमा करणार आहेत, याबाबत महाराष्ट्र राज्य राज्यपत्रित अधिकारी महासंघाचे अध्यक्ष विनोद देसाई, यानी  मुख्यमंत्री उध्दव ठाकरे याना पत्र लिहुन अधिकारी महसंघाचा  निर्णय कळविला आहे. या 65 हजार राजपत्रित अधिकार्यांची दोन दिवसाच्या पगारापोटी चाळीस कोटी रक्कम जमा होणार आहेत. 
कोरोना आपद्ग्रस्त स्थितीत राज्यातील जनतेला धीर देत मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे व संपूर्ण मंत्रीमंडळ अतिशय संयमाने प्रभावी उपाययोजना आखत आहे. त्यामध्ये तळहातावर पोट असणाऱ्या सामान्य जनतेविषयीची सरकारची तळमळ आणि व्यक्त केलेली काळजी ही देखील अतिशय गरजेची बाब आहे कोणत्याही आपद्ग्रस्त स्थितीत राज्यातील अधिकारी सढळ हस्ते मदत करीत नेहमीच शासनासोबत खंबीरपणे उभे राहिले आहेत . सध्याची परिस्थिती ही जागतिक आपत्ती असून त्याच्या प्रभावी निवारणासाठी राज्यातील अधिकाऱ्यांच्या माहे मार्च २०२० च्या महिन्यातील दोन दिवसांचा पूर्ण पगार परस्पर मुख्यमंत्री निधीमध्ये वळता करावा . महाराष्ट्र राजपत्रित अधिकारी महासंघ हा ७० खाते निहाय राजपत्रित अधिकारी संघटनांचा मान्यताप्राप्त महासंघ असलेने अशा पगार कपातीसाठी व्यक्तिगत संमतीची गरज नाही. आपल्या राज्याला या जागतिक आपत्तीतून सावरण्यासाठी एकजुटीने दानशूर व्यक्तीनी सढळ हस्ते शासनास सर्वतोपरी सहाय्य करावे असे आवाहन मुख्य सल्लागार ग.दी. कुलथे,डाॅ.सोनाली कदम,कोषाध्यक्ष नितीन काळे,सरचिटणीस विनायक लहाडे,यानी केले आहे .

No comments:

Post a Comment