शिरगाव मयताच्या संपर्कातील सर्व 21 जणांचे स्वॅब निगेटीव्ह, तालुक्यावरील संकट टळले - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2020

शिरगाव मयताच्या संपर्कातील सर्व 21 जणांचे स्वॅब निगेटीव्ह, तालुक्यावरील संकट टळले


चंदगड / प्रतिनिधी
मजरे शिरगाव (ता. चंदगड) येथील मुंबईहून आलेल्या एका 65 वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी (ता. 31) ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. हि व्यक्ती मुंबईतील कोरोना व्यक्तीच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे मृताच्या कुटुंबियांसह 21 जणांना तातडीने गडहिंग्लज येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यातील अगोदर पाच जणांचे व नंतर 16 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्या सर्वांचे स्वॅब निगेटीव्ह आल्याची माहीती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी सांगितले. त्यामुळे चंदगडकरांनी सुटकेचा निश्व:स सोडला आहे. 
मुंबईहून गावाकडे आलेल्या शिरगाव येथील एक 65 वर्षीय व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. या व्यक्तीच्या संपर्कातील त्याच्या कुटुंबातील व्यक्तीसह सर्व 21 जणांना खबरदारी म्हणून तातडीने गडहिंग्लज येथे हलविण्यात आले होते. यावेळी संपुर्ण गाव सिल करण्यात आले होते. प्रारंभी पाच जणांचे स्वॅब तपासणी पाठविण्यात आले होते. त्याचा अहवाल निगेटीव्ह आला. त्याचबरोबर उर्वरीत 16 जणांचा स्वॅबही पुण्याला तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. काल रात्री उशिरा त्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामध्ये उर्वरीत 16 जणही निगेटीव्ह असल्याचे अहवालावरुन समजले. त्यामुळे सद्यातरी चंदगड तालुक्यावरील संकट टळले आहे. तालुक्यासाठी हि बातमी दिलासदायक आहे. 

No comments:

Post a Comment