कुदनूर : येथील ग्रामस्थांनी कर्नाटकाशी जोडणारा हंदीगनूर रस्ता असा बंद केला आहे. |
कर्नाटकातील बेळगांव व बेळगुंदी येथे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने महाराष्ट्र हद्दीवरील चंदगड तालुक्यातील गावानी खबरदारी घेतली आहे. कुदनूर ग्रामस्थानी हंदीगनूर रस्ता शुक्रवारी रात्रीच बंद केला आहे. पण तालुक्याच्या पूर्व भागातील सीमेवरील अन्य जोड रस्ते खुले असल्याने प्रशासनाने तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
बेळगांव जिल्ह्यात कोरोनाची लागण झाल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगांवमधून चंदगडला येणाऱ्या सर्व सीमा तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिल्यानंतर सीमेवरील गावानी खबरदारी घेतली आहे . तालुका प्रशासनाने शनिवारी शिनोळी भागातील सीमेवरील कांही गावे सील केली आहेत . तसेच शुक्रवारी रात्रीच कुदनूर ग्रामस्थानी हदीगनूर रस्ता बंद करून प्रशासनाला सहकार्य केले आहे . पण चंदगड तालुक्याच्या पूर्व भागातील कर्नाटकाला जोडलेले दड्डी, कामेवाडी ,राजगोळी , तिरमाळ दिंडलकोप व किटवाड हे सहा जोड रस्ते अजून खुले असल्याने प्रशासनाने याची दखल घेण्याची गरज आहे . कर्नाटक - महाराष्ट्र सीमेवर असलेल्या कामेवाडी, राजगोळी खुर्द , तिरमाळ , कुदनूर किटवाड व दिडलकोप या गावातील लोकांचा कर्नाटकाशी जवळचा संपर्क आहे . अगदी चार ते पाच किलोमिटर अंतरावर कर्नाटकाची हद्द आहे . त्यामुळे बेळगाव बाजारपेठेशी येथील नागरिकांचा सतत संपर्क येतो . तसेच नातेसंबधही असल्याने लोकाची ये - जा सुरू असते . यातून कोरोनाचा प्रादर्भाव होऊ शकतो . यासाठी कदनूर ग्रामस्थानी हंदीगनर रस्ता बंद करून खबरदारी घेतली आहे . पण हा एक मार्ग फक्त बंद करुन चालणार नाही . त्यासाठी उर्वरित मार्गही तात्काळ बंद करण्याची गरज आहे . जिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार या सीमाही बंद व्हाव्यात अशी मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment