तुर्केवाडीमध्ये दुध संस्थांच्यावतीने मास्कचे वाटप, कोरोनाच्या संकटात सहकारी संस्था आल्या धावून - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2020

तुर्केवाडीमध्ये दुध संस्थांच्यावतीने मास्कचे वाटप, कोरोनाच्या संकटात सहकारी संस्था आल्या धावून


मजरे कार्वे / प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. चंदगड तालुक्यात सर्व गावांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, सॅनिटायजरचे वाटप, निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्याअंतर्गतच आज (शनिवार ४ एप्रिल रोजी) मौजे तुर्केवाडी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या तुर्केवाडी, वैताकवाडी, यशवंतनगरच्या ग्रामस्थांना मास्कचे वितरण करण्यासाठी गावातील दुध संस्था व विकास सोसायटीकडून मास्क उपलब्ध करुन देण्यात आले.
तुर्केवाडी गावच्या श्री. रवळनाथ दुध संस्था ५००, श्री. सोपानदेव दुध संस्था ५००, श्री. ज्योतिर्लिंग दुध संस्था २००, विकास सेवा सोसायटी १०००, विरदेव दुध संस्था, वैताकवाडी २००, महालक्ष्मी दुध संस्था वैताकवाडी २०० अशा स्वरुपात या सर्व संस्थांकडून तीनही गावातील ग्रामस्थांना मास्क वितरण करण्यासाठी देण्यात आले. यावेळी रवळनाथ दुध संस्थेचे चेअरमन नंदू ओऊळकर, सेक्रेटरी रमेश पाटील, सोपानदेव दुध संस्थेचे चेअरमन नंदकुमार गावडे, विकास सेवा सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण खोत, ज्योतिर्लिंग दुध संस्थेचे चेअरमन महादेव निवगिरे, विरदेव दुध संस्थेचे चेअरमन वैजनाथ गावडे, महालक्ष्मी दुध संस्थेचे चेअरमन मारियान लोबो, सरपंच रुद्राप्पा तेली, उपसरपंच अरुण पवार, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक तसेच आशा सेविका, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते.


No comments:

Post a Comment