बसर्गे येथील शेतकरी वैजू बेनके यांचा वीज पडून मृत्यू - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2020

बसर्गे येथील शेतकरी वैजू बेनके यांचा वीज पडून मृत्यू

 वैजनाथ भरमू बेनके
चंदगड / प्रतिनिधी
बसर्गेता चंदगड येथील वैजनाथ भरमू बेनके (वय -52) या शेतकऱ्याचा शेतात वीज पडून दूर्दैवी मृत्यू झाला.हि घटना आज सायंकाळी पाच वाजता घडली.

याबाबत अधिक माहिती अशी कि वैजनाथ बेनके हे आपल्या पत्नीसह ताम्रपर्णी नदीकाठी असलेल्या  मोळ्याचे  शेत येथे ऊसाला खत घालण्यासाठी गेले होते.सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास ढगांनी आभाळ भरून आले.वीजेचा कडकडाट सूरू होऊन हलक्या स्वरूपात पावसाला सूरवात झाली .याच वेळी जोराची वीज बसर्गे येथील नदीकाठी असलेल्या बेनके यांच्या शेतात वैजनाथ यांच्या अंगावर  पडल्याने  ते जागीच  मृत्युमुखी पडले.सोबत पत्नी सहा फुटावर ती पण खत घालत होती .बाकी चे भाऊ पण शेतात बाजूला होते. अचानक वीज कोसळल्यामुळे कुणालाच काही कळाले  नाही. त्यांच्या पश्चात पत्नी,दोन विवाहित मूली,नातवंडे असा परिवार आहे.या घटनेने संपूर्ण बसर्गे गावावर शोककळा पसरली आहे. गडहिगलज कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तुकाराम बेनके यांचे ते बंधू होत.


No comments:

Post a Comment