संपूर्ण जगभर कोरोनाचा कहर सुरू असून देशासहित राज्यात संचार बंदी लागू करण्यात आली आहे. अशा परिस्थिती अनेक रोजंदारीवर काम करणाऱ्या कुटुंबांना उदरनिर्वाहाचा प्रश्न भेडसावत आहे. चंदगड येथील कन्या विद्या मंदिरच्या मागील माळावर रहात असलेल्यांना सध्यस्थितीत काम नसल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचे होत असलेले हाल पाहून चंदगड तालुका पत्रकार संघाचे संस्थापक व चंदगड चे रहिवाशी अनिल धुपदाळे यांनी तांदुळ,तेल,डाळ,रवा,साखर,साबण, बिस्किट आदी जीवनावश्यक वस्तूंचे संच वाटप करुन दिलासा दिला. वस्तूंचे वाटप नगरसेविका अनुसया दाणी, सरोजना महेंद्र, म्म्ष्ष भाऊ सातवणेकर, अशोक निळकंठ दाणी, चेतन शेरेगार यांच्या हस्ते करण्यात आले. उपक्रमा नंतर या कुटुंबीयांच्यााा चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भाव दिसून आले.
04 April 2020
Home
chandgad
चंदगड येथे अनिल धुपदाळे यांचेकडून गरजवंताना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
No comments:
Post a Comment