कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण कोवाड गाव झालं सेल्फ कॉरंटाईन - चंदगड लाईव्ह न्युज

04 April 2020

कोरोणाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी संपूर्ण कोवाड गाव झालं सेल्फ कॉरंटाईन

कोरोनामुळे कोवाड येथील सर्व गल्यातील रस्ते  अशा पध्दतीने बंद केले आहेत. 
कोवाड / प्रतिनिधी   
जगभरात कोरोणा रोगाने धुमाकूळ घातला असून भारतासहित राज्यात देखील कोरोणा बाधित रुग्णाचा आकडा वाढत चालला आहे. 
कर्यात भागातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोवाड (ता .चंदगड)  येथे संचार बंदी असून देखील आजूबाजूच्या गावातील काही नागरिक हे वेगवेगळी कारणे दाखवून विनाकारण फिरत असल्यामुळे आज संपूर्ण कोवाड गावाने बाजारपेठे सहित गावातील प्रत्येक गल्लीने आज स्वतः ला सेल्फ कॉरंटाईन करून घेण्याचा निर्णय ग्रामस्तरीय कमिटीच्या आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. 

अवघ्या 25 किलोमीटर वर बेळगावला कोरोनाने दस्तक दिल्याने सीमाभागावातील प्रत्येक गावाने धास्ती घेतली आहे. 
कर्यात भागात प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोवाड गावातील सर्व नागरिकांनी स्वतः ला सुरक्षित करण्याच्या हेतूने आज गावातील सर्व गल्लीबोळ गावात येणारे सर्व मार्ग बंद केले आहेत. 
त्याची तात्काळ अंमलबजानीही करण्यात आली असून ज्याप्रमाणे बॅरीकेट्स उभारल्या जातात. त्याप्रमाणे प्रत्येक गल्या ह्या आज बंदिस्त झाल्या आहेत.


No comments:

Post a Comment