सीमेवरील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घेतली खबरदारी, प्रशासनाकडून वाढला वॉच, गावातील गल्ल्या बंद करण्याचे प्रयत्न सरु - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2020

सीमेवरील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने घेतली खबरदारी, प्रशासनाकडून वाढला वॉच, गावातील गल्ल्या बंद करण्याचे प्रयत्न सरु

कोवाड : येथे खबरदारी म्हणून ग्रामस्थानी सिमेंटचे पाईप व लाकडी ओंढके टाकून गल्ल्या बंद केल्या आहेत.
कोवाड / प्रतिनिधी
बेळगांव व परिसरात कोरोनाचे रुग्ण सापडल्याने चंदगड तालुका प्रशासनाने अलर्टता बाळगली आहे . महाराष्ट्र हद्दीतील गावावरुन वॉच वाढविला आहे . पण सीमेवरील सर्वच गावांतील नागरिकांनी स्वतःहून खबरदारी घेण्यास सुरवात केली आहे . रस्ते बंद करण्यासह स्वयंस्फूर्तीने गल्ल्याही बंद केल्या जात आहेत . आता गावातूनचं नव्हे तर लोकाना गल्लीतूनही बाहेर पडण्यास मज्जाव केला जात आहे .
शुक्रवारी बेळगांव व बेळगुंदी येथे रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनाने तात्काळ बेळगावहून येणाऱ्या चंदगड , नेसरी व गडहिंग्लज भागातील सीमा सिल करण्याच्या सुचना दिल्याने चंदगडचे तहसिलदार विजय रणावरे यांनी  शिनोळी परिसरातील ११ गावे तात्काळ सील केली आहेत . चंदगड तालुक्याच्या सीमेवरील बहुतांशी गावांचे बेळगांवपासूनचे अंतर फार कमी आहे . तसेच त्या ठिकाणच्या नागरिकांचा बेळगांशी सतत संपर्क येत असतो . त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाने सीमेवरील शिनोळी परिसरासह होसूर , किटवाड , कुदनूर , राजगोळी , यर्तनहही नरगहे या गावांवरही अधिक लक्ष ठेवले आहे .  आरोग्य विभागाकडून लोकांच्यात कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे . ग्रामपंचायत व दक्षता समितीकडून होम कारंटाईन लोकांच्यावर वॉच ठेवले जात आहे . शनिवार पासून सीमेवरील अनेक गावानी खबरदारी म्हणून स्वयंस्फूर्तीने कर्नाटकाशी जोडणारे रस्ते बंद केले आहेत . त्याच बरोबर आता गल्ल्याही बंद केल्या आहेत . कोवाड येथील तरुणानी गावातील १२ गल्ल्या लाकडी ओंढके , पाईप टाकून बंद केल्या आहेत . कुदनूर , राजगोळी , कालकुंद्री , कागणी , होसूर , किटवाड या गावातूनही गल्ल्या बंद करण्याचे प्रयत्न सुरु झाले आहेत . निर्जंतुकीकरणावरही गावकऱ्यांनी भर दिला आहे . गावातून कुणालाही बाहेर सोडायचे नाही व नवीन गावात कुणाला प्रवेश द्यावयाचा नाही . या हेतूने गल्ल्या बंद केल्या जात आहेत . होसूर चेकपोस्ट नाक्यावर पोलिसानी गस्त वाढविल्याने कर्नाटकातून महाराष्ट्र हद्दीत होणाऱ्या वाहतूकीला चाप बसला आहे.

कर्नाटकातील कोरोनाबाधित व्यक्तिच्या संपर्कात कोणी आले आहे का, याची चौकशी सुरु आहे. सीमेवरील सर्व गावांतील दक्षता समितीना याची चौकशी करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने सीमेवरील गावांवरून अधिक लक्ष केंद्रीत केल्याचे चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment