संभाजी ब्रिगेड चंदगडच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट चे वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

05 April 2020

संभाजी ब्रिगेड चंदगडच्या वतीने पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पीपीई किट चे वाटप


हलकर्णी (प्रतिनिधी)
कोरोना या रोगाने जगभर थैमान घातले आहे. प्रगत देशांमध्ये देखील हजारोच्या संख्येने रुग्ण वाढत आहेत. रोज असंख्य मृत्युमुखी पडत आहेत. रोगाचा व्हायरस भारतात ही आला असला तरी  कोल्हापुर जिल्हा प्रशासनाच्या सतर्कतेमुळे जिल्ह्यात कोरोनाला थारा मिळाला नाही.  याचं श्रेय जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, आरोग्य अधिकारी, जिल्हा, शहर व सर्व तालुक्यांतील पोलीस, आरोग्य विभाग व प्रशासन यंत्रणेला जाते.
यात पोलीस यंत्रणेचे योगदान मोठे आहे. सध्या तबलीग व मरकज घटनांमुळे पोलीसांवरील ताण वाढला आहे. ग्रामीण भाग व कर्नाटक सीमेवर बंदोबस्तासाठी असणाऱ्या पोलीस बांधवांना सामाजिक बांधिलकीतून संभाजी ब्रिगेड चंदगडच्या वतीने मास्क ,सॅनिटायझर, बिस्कीट पुडे, हॅन्डवाॅश, पाण्याच्या बाटल्या आदींचे वाटप करण्यात आले. चंदगड पोलीस स्टेशन, महाराष्ट्र कर्नाटक सिमेवर शिनोळी फाटा, होसुर, शिरगाव फाटा, पाटणे फाटा आदी ठिकाणी सर्व पोलिसांना हे साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेड चंदगड तालुका अध्यक्ष सुशांत नौकुडकर,  ब्रिगेड सदस्य सुभाष होनगेकर, सुहास कांबळे, रुपेश कुंभार, सलिम मुल्ला आदी उपस्थित होते. 

No comments:

Post a Comment