चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्याच्या पूर्व बाजूस कर्नाटकातील बेळगाव जिल्हा असून बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी या गावी करोना बाधित रुग्ण असल्याचे समजते. चंदगड तालुक्यातील शिनोळी खुर्द, शिनोळी बुद्रुक, कोलीक, खालसा म्हाळुंगे, मळवीवाडी, तुडिये, हजगोळी, सरोळी, ढेकोळी, ढेकोळीवाडी, सुरुते हि अकरा गावे बेळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत असून या गावातील नागरिक आपल्या दैनंदिन कामकाजासाठी बेळगाव येथे ये-जा करतात. त्यामुळे चंदगड तालुक्यातील या 11 गावातील लोकांशी रुग्णांचा व त्यांच्या नातेवाईकांचा प्रादुर्भाव होवू नये, यासाठी अकरा गावे सील करण्यात आल्याची माहीती तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिली.
देशांमध्ये करोणा विषाणूंचा प्रादुर्भाव झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये याची लागण झालेले आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून चंदगड तालुक्यामध्ये करोना विषाणू बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून बेळगाव जिल्ह्यातील बेळगुंदी घटनेच्या पार्श्वभूमीवर सीमेलगच्या अकरा गावातील नागरिकांनी आपले गाव सोडून अन्य ठिकाणी जाण्यास व बाहेरुन या गावात येण्यास बंदी घातली आहे. मागील पंधरा दिवसांमध्ये जे लोक बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी या गावी जाऊन आलेले असल्यास त्यांनी तात्काळ आरोग्य केंद्रांमधून जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेवून कॉरटाईन केंद्रामध्ये दाखल व्हावे. जे नागरिक रुग्णाच्या संपर्कात आले असतील त्यांची रवानगी तुर्केवाडी येथील कॉरटाईन केंद्रामध्ये करावी. सदर अकरा गावामध्ये जाऊन आरोग्य सेवक, ग्रामसेवक, तलाठी, पोलिस पाटील व दक्षता कमिटी यांनी गावातील घरी जाऊन लोकांचा सर्वे करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितावर आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 अन्वये महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 43 कारवाई करण्यात येईल असा आदेश तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण अध्यक्ष तथा तहसीलदार विनोद रणवरे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment