![]() |
ओलम ॲग्रो (हेमरस) कडून जीवनावश्यक वस्तूंचे किट्स तहसिलदार विनोद रणवरे यांच्याकडे देताना ओलमचे बिझनेस हेड भरत कुंडल व सहकारी. |
राजगोळी ता.चंदगड येथील ॲग्रो ओलम इंडिया प्रा .लि. (हेमरस) या साखर कारखान्या कडून चंदगड येथे 100 जीवनावश्यक वस्तूंच्या किटस् वाटप केल्या. कारखान्याचे बिझनेस हेड भरत कुंडल यांनी या किटस् तहसिलदार विनोद रणवरे यांचेकडे सुपूर्द केल्या.
व्हीडीओ पाहण्यासाठी वरील व्हीडीओवर क्लिक करा
कोरोनाच्या पार्श्वभूमिवर चंदगड तालूक्यात लॉक डाऊन चालू आहे . अशा परिस्थितीत अनेक कंटुंबाना घराबाहेर पडता आले नाही. त्यामुळे अनेकांना जीवनावश्यक वस्तूंची टंचाई निर्माण झाली आहे. या सर्वांची जाणीव ठेवून हेमरस (ओलम) प्रशासनाने तांदूळ 5 किलो, आटा 3 किलो, तेल 1 किलो, मीठ अर्ध्या, हळद, मसाला, भांडी साबण, अंघोळीच्या साबण, माचीस, चटणी इ. जीवनावश्यक वस्तूच्या 100 किट्स ह्या वितरण करण्यात आल्या. यावेळी वाय विनोदा, अजिझ झुंजाणी, राजेंद्र खोत, कारखान्याचे इतर अधिकारी उपस्थित होते. हेमरस साखर कारखाना हा ऊस उत्पादक भागातील शेत कऱयांच्या नेहमीच प्रत्येक अडचणीमध्ये आजवर धाऊन गेलेला आहे .आज कोरोना विरुद्धच्या लढाईत त्यांनी सदर वस्तूंचे वाटप करून जो उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. कोरोनामूळे जागतिक संकट निर्माण झाले आहे.या संकटाला सामोरे जाण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तीनी मदतीचा हात देण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे आपण कोरोना विरोधातील लढाई जिंकू शकेन असे चंदगडचे तहसिलदार विनोद रणवरे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment