दहावी भूगोलचा पेपर होणार की सरासरी गुण मिळणार? - चंदगड लाईव्ह न्युज

10 April 2020

दहावी भूगोलचा पेपर होणार की सरासरी गुण मिळणार?


तेऊरवाडी / प्रतिनिधी  (एस. के. पाटील) 
कोरोनाच्या वाढत्या फैलावामूळे देशात कलेल्या लॉक डाऊनमुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेला  इयत्ता १०वी बोर्ड परिक्षेचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. २३ मार्च रोजी होणारा हा पेपर रद्द झाल्याने तो पून्हा न घेता या पेपरचे विधार्थी वर्गाला सरासरी गुण देण्याची मागणी माजी अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यानी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचेकडे केली आहे. यावर शिक्षणमंत्री प्रा . गायकवाड यानी येत्या चार दिवसात निर्णय घेणार असल्याचे सांगीतले. त्यामूळे आता भूगोलाचा पेपर होणार की याचे सरासरी गुण मिळणार? याची किमान चार दिवस तरी वाट विद्यार्थ्यांना पहावी लागणार आहे.
सध्या देशाबरोबर महाराष्ट्रातही कोरोनाचा फैलाव मोठ्या वेगाने होत आहे. याचा परिणाम म्हणून दहावीचा शेवटी राहिलेला भगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आला आहे. यानंतर पेपर होणार की होणार नाही? या विवंचनेत सर्व विद्यार्थी वर्ग आहे. महाराष्ट्रात वेगाने कोरोना पसरत असल्याने अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्र लॉक डाऊन आहे. सर्व काही ठप्प असताना भूगोलाचा पेपर घेणे शिक्षण मंडळाला  खूपच अडचणीचे आहे . पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी भूगोलाचा पेपरच रद्द करून या विषयाचे विद्यार्थ्याना सरासरी गुण देण्यात यावे अशी मागणी माजी अर्थमंत्री आमदार सुधिर मनगुंटीवार यानी शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांचेकडे केली आहे. त्यामूळे आता १० वीचा पेपर होणार? की सरासरी गुण मिळणार हे येत्या चार दिवसात समजणार आहे . सध्या मात्र विद्यार्थ्याबरोबर पालक वर्गात एका बाजूला कोरोनाची भिती तर दुसऱ्या बाजूला भूगोलाच्या पेपरचा तणाव असे दृष्य दिसून येत आहे.


No comments:

Post a Comment