कुदनुर येथील युवकांनी स्मशानभुमीची स्वच्छता केली. |
कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉक डाऊन सूरू आहे. सर्वच व्यवहार व व्यवसाय बंद असल्याने गावावडील युवक रिकामीच आहेत. पण घरी रिकामी न बसता शासनाच्या नियमांचे पालन करत कुदनूर (ता. चंदगड) येथील युवकांनी स्मशाभूमीची स्वच्छता व सुशोभीकरणाला सुरवात केली.
लॉक डाऊन मुळे युवकाना भरपूर रिकामा वेळ मिळत आहे . काही युवक पुस्तके वाचन , टिव्ही पहाणे , घरची साफसफाई अशा कामामध्ये व्यस्त आहेत. समाजकार्या नेहमी अग्रेसर असणाऱ्या राजू रेडेकर यानी आपल्या गावातील सवंगडी कट्टा या वॉट्स अॅप ग्रुप वरील मित्र मंडळी अनिल निर्मळकर, दयानंद रेडेकर,नामदेव पवार,प्रभाकर तलवार,विठ्ठल निर्मळकर, महादेव बामणे,रसूल उस्ताद, हणमंत बामणे, लक्ष्मण शहापूरकर या मित्रांसमोर स्मशानभूमी स्वच्छतेच काम करण्याचा प्रस्ताव मांडला. तात्काळ ऑनलाईनवरच याला संमती दर्शवत या यूवकानी काम चालू करण्यासाठी सहभाग दर्शवला. संचारबंदी काळात सोशल डिस्टन्स ठेवत कामाला सुरवात केली. येथील स्मशानभूमिला खूपच अवकळा आली होती. ती दूर करण्याचा प्रयत्न केला. भविष्यात येथे कंपाउंड वॉल, गटर, गेट, पेविंग ब्लॉक, वीजेची व्यवस्था,पाण्याची टाकी पाईपलाईन, गटर मध्ये सिमेंट पाइप,बगीचा करणे अशी कामे ग्रामस्थांचा मदतिने करण्यात येणार आहेत.
कुदनूर गाव तालुक्यामध्ये सर्वात मोठ व नामांकित गाव असून येथील स्मशान भूमीची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. येथे दारूच्या बाटल्यांचा खच पडला होता. अर्धवट जाळालेली लाकडे,मटकी,झाडे झुडपे,सगळीकडे तिरड्याच तिरड्या, गावातील जुन्या घराच्या खापऱ्या, मोठमोठे खड्डे, इतकी वाईट दुरावस्था होती. ती या गृपच्या सर्वानी स्वछ केली आहे. त्याबरोबरच समोरच्या गटराची खुदाई व पाईप सुद्धा घालणार आहेत . या युवकांचा आदर्श घेत यापुढे गावातील लोकांनी स्वच्छता राखणे फार गरजेचे आहे.
No comments:
Post a Comment