कोवाड / प्रतिनिधी
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता नागरिकानीच खबरदारी घेतली पाहिजे. आपणचं आपल्या कुटुंबाचा आणि देशाचा रक्षणकर्ता आहोत. ही भावाना मनात निर्माण करण्यासाठी नागरिकानी घराबाहेर न पडणे, मास्क वापरणे, हात स्वच्छ धुणे यासह सोशल डिस्टन्सिंग पाळणे, अशा प्रकारचा संदेश देत येथील कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने कोवाड परिसरात १०० स्वयंसेवकांच्या मदतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून सोशल डिस्टन्सिंग ठेवून कोरोना जनजागृती मोहिम सुरु केली आहे.
कोरोनाचे संकट दूर करणे ही आता प्रत्येक नागरिकांची जबाबदारी असल्याने कला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे प्रमुख डॉ. आर. डी. कांबळे, डॉ. बी. एस. पाटील, प्रा. आर. टी. पाटील यांनी सोशल मीडियामार्फत कोरोना जनजागृती उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी कोवाड परिसरात १०० स्वयंसेवकांची निवड केली आहे. "मीच माझा रक्षक, माझे आरोग्य माझी जबाबदारी' या घोषमंत्राचा वापर करुन व्हॉटसप , फेसबुक मोबाईल व रांगोळीच्या माध्यमातून गावागावातून गेल्या वीस दिवसापासून जनजागृतीचे काम सुरु ठेवले आहे. प्रत्येक स्वयंसेवक आपल्या गावी घरी बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृतीचे काम करत आहे. महाविद्यालयाकडून त्याना मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे घराघरात कोरोना जनजागृतीचे संदेश पोहचत आहेत. त्यासाठी १ मिनीट ८ सेकंदाची देशभक्तीपर गीताची व्हीडीओ क्लीप तयार केली आहे. त्यातून नागरिकाना कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी घाबरु नका पण जागरुक रहा तसेच साबणाने हात स्वच्छ धुवा, शिकताना किंवा खोकताना तोंडाला रुमाल धरा, सर्दी किंवा खोकला सदृश्य लक्षणे अढळल्यास आरोग्य केंद्राशी संपर्क साधा, असा संदेश दिला आहे. तसेच लॉकडाउनचे पालन काटेकोर करा, घरात राहा सुरक्षित राहा, सोशल डिस्टन्सिंग पाळा, मास्कचा वापर करा व श्वसनासंबंधी शिष्टाचार पाळा अशी पंचसुची दिली आहे. केंद्रीय आरोग्य विभागाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांची माहिती दिली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी व काय करू नये याचीही माहिती यामध्ये दिली आहे. तसेच कोरोनाचे संकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने जागरुक राहिले पाहिजे. त्यासाठी घाबरु नका पण खबरदारी घ्या, असे आवाहनही करण्यात आले आहे.
रोनाचे संकट दूर करण्यासाठी महाविद्यालयाच्यावतीने कोरोना जनजागृती मोहिम सुरु केली आहे. सोशल डिस्टन्सिंग ठेवून सोशल मिडियामार्फत हे कार्य चालू आहे. नागरिकांचा त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शासकीय सुचनांनुसार वेळोवेळी यात बदल करून लोकांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचविण्याचे काम सुरु ठेवणार असल्याचे प्राचार्य डॉ. एस. एम. पाटील यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment