![]() |
कोरोनाबाबत जनजागृती करताना विद्यार्थींनी. |
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एक सामाजिक जाणीव म्हणून नागरिकांनी कोरोनाबाबत खबरदारी घेतली पाहिजे,गरजूंना मदत झाली पाहिजे ही भावना मनात ठेवून आणि नागरिकांच्या मध्ये जनजागृती करावी यासाठी राष्ट्रीय सेवा योजना यशवंतराव चव्हाण महाविद्यालय व गुरुवर्य गुरुनाथ विठ्ठल पाटील कनिष्ठ महाविद्यालय यांचेमार्फत राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांच्या मदतीने जनजागृती व मदत केली जात आहे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी वाय निंबाळकर व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी डॉ.राजेश घोरपडे डॉ.चंद्रकांत पोतदार,प्रा. सी.एम. तेली,प्रा. पी.एम दरेकर यांनी सोशल मीडिया मार्फत कोरोना जनजागृती उपक्रम सुरू केले. शिवाजी विद्यापीठाने दिलेल्या सूचनेनुसार युनिशिवाजीएनएस एसफाईटकोविड हा विद्यार्थ्यांचा ग्रुप तयार करण्यात आला.राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक कोरोना बाबतचे ट्रेनिंग घेत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावे यासाठी ग्रुपद्वारे मार्गदर्शन केले जात आहे .विद्यार्थ्यांनी स्वतः ट्रेनिंग घेऊन ते आपल्या कुटुंबियांना समजावून सांगत आहेत.चित्रांद्वारे, रांगोळीद्वारे, तसेच पोस्टाद्वारे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय काळजी घ्यावी याबाबतचे संदेश व्हाट्सअप द्वारे फेसबुकद्वारे समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. काही विद्यार्थी गावामध्ये ग्रामपंचायत, पोलिसांना मदत करत आहे. गरजू लोकांना स्वयंसेवक धान्याच्या स्वरूपात मदत करीत आहेत.ज्या गावामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आहे त्या प्रत्येक गावांमध्ये जनजागृतीचे काम स्वयंसेवक करत आहेत. विद्यापीठाकडून महाविद्यालयाकडून त्यांना मार्गदर्शन केले जात आहे.त्यामुळे घराघरात कोरोना रोखण्या बाबतचे संदेश पोहोचत आहेत.घरी बसून आणि सोशल मीडियाद्वारे विद्यार्थी जनजागृतीचे काम करीत आहेत. नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे, त्यानी सुरक्षित आपल्या घरी राहावे, पुन्हा पुन्हा हात धुवा,सर्दी किंवा खोकला सदृश्य लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधा,मास्क बांधूनच घराबाहेर पडा असे संदेश विद्यार्थी आपल्या कुटुंबियांना तसेच सोशल मिडीयाद्वारे घरी बसूनच आपल्या मित्रांना, पाहुण्याना पोहोचवत आहेत. मास्क बांधणे फार गरजेचे आहे. यासाठी काही स्वयंसेवक स्वतः घरी मास्क तयार करत आहेत.
No comments:
Post a Comment