बेळगावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चंदगड तालुक्यात सतर्कतेचा इशारा - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2020

बेळगावात कोरोनाचे रुग्ण वाढल्याने चंदगड तालुक्यात सतर्कतेचा इशारा

चंदगड / प्रतिनिधी
         बेळगाव व परिसरात कोरोनाचे रूग्ण वाढल्याने बेळगाव लगतच्या कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यातील सर्व सीमा बंदीस्त  करून पोलिसांनी खडा पहारा ठेवला आहे. चंदगड तालुक्यातील सीमेवरील संपूर्ण वहातुक रोखण्यासाठी आदेश प्रांताधिकारी विजया पांगारकर यांनी जारी केला आहे.
       बेळगाव जिल्ह्यातील काल बुधवारी कोरोनाचे लक्षण असलेले सतरा जन होते तर आज गुरुवारी हा आकडा सदतीसवर.पोहंचला पैकी हिरेबागेवाडी येथील त्या महीलेचा म्रत्यु झाला आहे त्यामुळे आता प्रत्यक्षात छतीस रूग्णावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर चंदगड हा तालुका बेळगावला लगतचा आहे तालुक्यातील  कार्यालयीन व्यवहार वगळता सर्व व्यवहार बेळगाववर अवलंबून असतात सर्व प्रकारची होलसेल  खरेदी कामे,शेती माल विक्री-खरेदी, खाजगी नोकरी ,दवाखाने, ईत्यादी बाबतीत तालुक्याचा बेळगावशी पूर्वीपासून घनिष्ठ संमध आहे. चंदगड तालुका हा पूर्वी बेळगाव मध्येच होता. चंदगड हे महालचे ठिकाण होते. या पार्श्वभूमीवर हे पाहता चंदगडला बेळगाव शिवाय पर्याय नाही. हे जरी असले तरी आता कोरोना च्या महाभयंकर संसर्ग चा फैलाव बेळगाव ला आल्यानंतर आता कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने अत्यंत खबरदारी घेत स्थानिक आधिकारी पांगारकर यांनी त्वरित खबरदारी घेतली आहे सर्व त्या उपाययोजना राबवण्यासाठी संमधीत सर्व.यंत्रणेला आदेश दिले आहेत चंदगड -बेळगाव मार्गावरील शिनोळी येथे तर कोवाड-बेळगाव मार्गावरील होसुर जवळील  सीमेवर रस्ता बंद करण्यात आला आहे , यापूर्वी तुडये-हाजगोळी,बेळगुंदी ही गावे कडक लाँकडाउनमध्ये आहेत. बेळगाव कडून आता कोणत्याही प्रकारचे साहित्य साधने आणण्यात येणार नाहीत ही दक्षता घेतली जावी यासाठी आज दिवसभर चंदगडचे तहसीलदार विनोद रणवरे तालुक्यातील सीमाहद्दलगतच्या भागाची पाहणी करुन सुचना करत होते.


No comments:

Post a Comment