कोरोणाच्या युद्धामधील खरे वॉरिअर कोवाडचे डॉ. पाटील कुंटुबिय - चंदगड लाईव्ह न्युज

17 April 2020

कोरोणाच्या युद्धामधील खरे वॉरिअर कोवाडचे डॉ. पाटील कुंटुबिय

तेऊरवाडी / प्रतिनिधी 
संपूर्ण  देश आज कोरोणाच्या महाभंयकर संकटाने ग्रासला  आहे .महाराष्ट्रातील  कोरोणा रुग्णाच्या वाढत्या संख्येमुळे महाराष्ट् राज्य कोरोनाचा केंद्रबिंदू  ठरतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्य सरकार,आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत खासगी डॉक्टरनी आपापल्या ओपीडी सुद्धा  सुरू केल्या आहेत.माणसातील देवमाणसं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टरामध्ये  कोवाड ता . चंदगड येथील  डॉ .पी .एस . पाटील यांचे  अश्विनी नर्सिंग होम पुर्ण कुटुंब हे कर्यात भागासाठी  रुग्णासाठी दैवत ठरले आहे.लॉकडाऊन च्या दिवशीपासून हे पूर्ण कुटुंब  डॉक्टरी पेशातुन समाजाची सेवा  अविरतपणे  करत आहेत. स्वतः डॉ .पी .एस. पाटील एम .बी .बी .एस आहेत . दोन मुलगे डॉक्टर , दोन सुना डॉक्टर , मोठा मुलगा डॉ . अमोल पाटील  एम .डी .व भुलतज्ञ आहे . त्यांच्या पत्नी डॉ .वृषाली पाटील एम .बी .बी .एस .डी . जी .ओ .स्त्रीरोग तज्ञ आहेत . तसेच दुसरा मुलगा डॉ . अभिजित पाटील डेंटल सर्जन आहेत . त्यांच्या पत्नी डॉ . प्रियंका पाटील हया बी .डी .एस .आहेत. संपूर्ण कुटुंब वैद्यकिय सेवा बाजावत आहे . याची प्रचिती  ही सध्या अशाच एका चांगल्या कामामुळे  समाजासमोर आली.चार दिवसापुर्वी तर नजीकच्या गावातील नौकुडकर कुटुंबियांना तर साक्षात डॉ . पाटील यांच्या रूपाने प्रत्यय आला. श्री नौकुडकर हे आपल्या गरोदर मुलीला घेऊन  डॉ .पाटील यांच्या दवाखाण्यात घाबरत - घाबरतच   आले. पण क्षणाचाही विलंब न करता डॉ. वृषाली यांनी त्या मुलीची डिलिव्हरी अगदी सुखरूप रित्या करून माणसातील माणुसकी अजूनही जिवंत आहे हे कृतीतून दाखवून दिले . देशात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते आजतागायत  पाटील कुटुंबिय वैद्यकिय सेवा देत असून खऱ्या अर्थाने कोरोणा योध्याची भूमिका अगदी निस्वार्थीपणे बजावत आहेत.आज सामाजातील अशाच अनेक सहकार्याचे हात समोर आले तर कोरोना विरुद्ध ची लढाई आपण सहज जिंकू शकेन असे मत यावेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना डॉ. पी.एस. पाटील यांनी व्यक्त केले.


No comments:

Post a Comment