दारु घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील दोघांना किटवाड ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अटक - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2020

दारु घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील दोघांना किटवाड ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे अटक

कोवाड / प्रतिनिधी
कोरोनामुळे सर्वत्र लॉकडॉऊन असतानाही संचारबंदीच्या काळात दुचाकीवरुन गावठी दारु घेऊन जाणाऱ्या कर्नाटकातील दोघांना किटवाड (ता. चंदगड) येथील ग्रामस्थांनी गावालगतच्या सीमे नावाच्या शेताजवळ शिताफीने पकडून पोलिसांच्या हवाली केले. जोतिबा ईश्वर रुटकुटे (वय, २८,रा.कडोली.ता बेळगांव) व नागराज आपय्या पाटील (वय, २० रा. गुंजनहट्टी ता. बेळगांव) अशी संशयीतांची नावे आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. पोलिसानी दारुचे केन व मोटरसायकल ताब्यात घेऊन आरोपीना अटक केली आहे. विनापरवाना दारुची वाहतूक व संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसानी गुन्हा नोंद केला आहे. आरोपी विरोधात फिर्याद  संतोष साबळे यानी फिर्याद दिली.
यासंदर्भात पोलिसातून मिळालेली माहीती अशी - बेळगांव मध्ये कोरोना रुग्ण सापडल्याने जिल्हाधिकाऱ्यानी चंदगड तालुक्यातील बेळगावला जाणारे सर्व मार्ग बंद करण्याच्या सुचना दिल्याने सीमेवरील गावानी आपापल्या गावांचे मार्ग बंद केले आहेत. तरीही कर्नाटकातून कांही लोक गावठी दारुसाठी होसूर परिसरात येत असल्याची किटवाड ग्रामस्थांना कुणकुण लागली होती. याबाबत गावकऱ्यांनी पोलिसांना कल्पना दिली होती. शुक्रवारी सकाळी किटवाड हद्दीत लावले होते. पुन्हा सायंकाळी दुचाकीवरुन दोघेजन दारु घेऊन जाताना निदर्शनाला आल्याने ग्रामस्थांनी त्याना पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी त्यांच्याकडे प्लास्टीक कॅनमध्ये १० लिटर काजूची दारू किंमत १२०० रूपये व हिरो होंडा मोटरसायकल (KA-२२-E A- ६८८९) किंमत १५००० रूपये जप्त करण्यात आले असून आरोपीना अटक करण्यात आले आहे. घटनेची नोंद कोवाड पोलिसात झाली असून श्री. चव्हाण तपास करत आहेत. 

No comments:

Post a Comment