चंदगड / प्रतिनिधी
शहरासह तालुक्यात आज दुपारी चार वाजल्यानंतर वळीव पाऊस झाला. प्रारंभी मोठ-मोठ्या थेंबाचा पाऊस झाला. त्यानंतर मात्र हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून वातावरणात उष्मा जाणवत होता. दुपारी आकाशात काळे ढग जमून आल्याने पाऊस पडणार हे निश्चित होते. दुपारी चार नंतर पावसाला सुरवात झाली. अचानक आलेल्या या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. हा पाऊस मिरची, ऊस, भुईमूग व काजू पिकांसाठी उपयुक्त ठरला आहे. चंदगड शहरासह कार्जिणे, शिरगाव, हंबेरे, आसगाव, सुळये, नांदवडे, नागनवाडी, कोकरे परिसर व तालुक्यात अन्य भागात कमी अधिक प्रमाणात ठिकठिकाणी पाऊस झाला आहे. या आठवड्यामध्ये पावसाने चार वेळा हजेरी लावली आहे. करोनाचे देशासह राज्यावर संकट असताना पाऊस पडून वातावरण थंड होत असल्याने नागरीकांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहे.
No comments:
Post a Comment