जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला चंदगडकरांचा प्रतिसाद, शहरातील सर्व गल्या उस्फुर्तपणे बंद - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2020

जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनाला चंदगडकरांचा प्रतिसाद, शहरातील सर्व गल्या उस्फुर्तपणे बंद

चंदगड शहरातील नवीन वसाहतीमध्ये जाणाऱ्या रोड काड्या बांधून असा बंद केला आहे. 
चंदगड / प्रतिनिधी
करोनाचा प्रसार रोखला जावा, विनाकारण कोणीही रस्त्यावर फिरु नये. यासाठी चंदगड शहरातील 17 वार्ड आज शहरवासियांनी उस्फुर्तपणे स्वत:च्या सुरक्षेसाठी सर्व गल्या लॉक केल्या. केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या ठिकाणाहून प्रवेश दिला जात आहे. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढलेल्या आदेशाचे तातडीने पालन करुन गल्लीतील रस्ते बंद केले आहेत. त्यामुळे शहरात शुकशुकाट आहे. जवळपास शहरातील सर्वच गल्या लॉक झाल्यामुळे लोकांतून उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. त्यामुळे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन प्रशासनाच्या वतीने केले आहे. 
चंदगड - संभाजी चौकातील आंबेडकर नगरकडे जाणारा रस्ताही बंद केला आहे. 
चंदगड तालुक्याचा कर्नाटक राज्यातील बेळगावशी जवळचा संबंध आहे. भाजीपाला खरेदी-विक्री, औषधोपचार व विविध प्रकारच्या खरेदीसाठी चंदगड तालुक्यातील अनेक लोक बेळगावशी संपर्कात आहेत. बेळगाव जिल्ह्यात करोना रुग्णांची संख्या चाळीसहून अधिक झाल्याने चंदगड तालुक्यासह सीमाभागातील गावांगावांच्या सर्व सीमा बंद केल्या गेल्या आहेत. बेळगाव जिल्ह्यातील रुग्णांची वाढती संख्या पाहता मुख्य रस्ता वगळता गावा-गावातील सर्व गल्या सेल्फ कॉंरटाईन झाल्याचे चित्र चंदगड तालुक्यात पहायला मिळत आहे. गावागावातील तरुणांनी सीमा बंद करुन त्यावर रात्रदिवस कडा पहारा दिला जात आहे. 
आझाद गल्लीमध्ये जाणारा रस्ताही असा बंद केला आहे. 
शुक्रवारी कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या आदेशाची ग्रामीण भागातही तातडीने अंमलबजावणी झाल्याने सर्वत्र सामसुम आहे. चंदगड शहरातून पोलिस दिवसभर गस्त घालून ये-जा करणाऱ्यांना हटकत होते. विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांना प्रसादही देत होते. त्यामुळे बाजारपेठेत शुकशुकाट होता. नगरपंचायतीच्या वतीने शहरातील नागरीकांनी वेळोवेळी होणाऱ्या बदलांची माहीती स्पिकरवरुन दिली जात आहे. बेळगाव शहरातून चंदगड तालुक्यात भाजीपाला सप्लाय सद्या बंद करण्याचे आले आहे. शहरातील मुख्य बाजारपेठ वगळता अन्य गल्यातील रस्ते बंद केल्याने विनाकारण फिरणाऱ्यांवर आपोआप मर्यादा आल्या आहेत. 

No comments:

Post a Comment