चंदगड तालुक्यातील त्या दोघांचे अहवाल निगेटीव्ह - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2020

चंदगड तालुक्यातील त्या दोघांचे अहवाल निगेटीव्ह

चंदगड / प्रतिनिधी
चंदगड तालुक्यातील कडलगे व बुझवडे येथील दोघांचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आले होते. त्यामुळे खबरदारी म्हणून संबंधितांच्या कुटुंबियांना गावातच कॉरटाईन करण्यात आले. त्यापैकी बुझवडे येथील महिलेचा व कडलगे बुद्रुक येथील व्यक्तीचाही रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आर. के. खोत यांनी दिली. 
बुझवडे गावातील एक महिला 23 मार्च 2020 रोजी पुण्याहून बुझवडे येथे आली होती. तिला सर्दी व खोकल्याचा त्रास जावणू लागल्याने गडहिंग्लज येथे तपासणीसाठी पाठविले. तीचा स्वॅब तपासणी पाठविण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट निगेटीव्ह आला आहे. तसेच कडलगे बुद्रुक येथे मुंबईहून 19 मार्च 2020 रोजी गावी आलेली एक व्यक्ती प्रवासा दरम्यान एका संशयितांच्या संपर्कात आल्याचा संशय होता. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून तालुका प्रशासनाच्या वतीने त्याला चार दिवसापूर्वी गडहिंग्लज येथे कॉरंटाईन केले होते. त्यांचा स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. त्याचाही अहवाल निगेटीव्ह आल्याने आरोग्य विभागाने सांगितले. 


No comments:

Post a Comment