कालकुंद्री / प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या लॉकडाउन मुळे म्हाळेवाडी येथे बीड येथील एक ऊस कामगारांची 7 कुटुंब असलेली टोळी अडकून पडली आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, यासाठी कालकुंद्री (ता. चंदगड) येथील सामाजिक, राजकीय कार्यकर्ते एम. जे. पाटील यांनी या टोळीतील प्रत्येक कुटुंबाला 10 किलो तांदूळ व गहू आदी अन्नधान्य दिले. शिवाय सर्व महिलांना साड्याही दिल्या. जोईपर्यंत आरोग्याची आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करताना गरज भासल्यास पुन्हा मदतीचे आश्वासन व धिर दिला. श्री. पाटील यांच्या मदतीमुळे टोळीतील सर्व पुरुष व महिलांनीच्या डोळ्यात समाधान दिसत होते.
No comments:
Post a Comment