उमगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने मोफत मास्क व गरजूंना धान्याचे वितरण - चंदगड लाईव्ह न्युज

16 April 2020

उमगाव ग्रुप ग्रामपंचायतच्या वतीने मोफत मास्क व गरजूंना धान्याचे वितरण

चंदगड / प्रतिनिधी
कोरोना विषाणू प्रतिबंध उपयासाठी संपुर्ण देशात लॉकडाऊन मुळे गरजूंना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजने अंतर्गत धान्य शासनाने उपलब्ध करून दिले आहे कोरोना दक्षता कमिटीने न्हावेली येथील  वागदादेवी महिला दुकान येथे शिस्तबद्ध पद्धतीने मोफत तांदूळ वाटप करताना सोशल डिस्टन्स पाळण्यात आले तसेच गावात कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोफत मास्क सरपंच गणपत सुतार, उपसरपंच रुक्माणा गावडे, सदस्य अपूर्वा पेडणेकर, ग्रामसेवक आर. आर. चव्हाण, पोलीस पाटील मनोहर गावडे, कोतवाल बाबु कांबळे यांच्या उपस्थितीत धान्य वाटप करण्यात आले.

No comments:

Post a Comment