कोवाड येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप - चंदगड लाईव्ह न्युज

15 April 2020

कोवाड येथे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत मोफत धान्य वाटप

कोवाड येथे कोवाड सोसायटी कडून सोशल डिस्टंन्स ठेवून धान्य वाटप करण्यात येत आहे. 
तेऊरवाडी / प्रतिनिधी
कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना जिल्ह्यात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत कोवाड येथे लाभार्थ्यांना मोफत धान्य वाटप सुरू झाले आहे. मंगळवार आणि  बुधवार या दोन दिवसात कोवाड विकास सेवा सोसायटीचे रास्तभाव केंद्रावर त्याचे वितरण करण्यात आले.
या योजनेत प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना व अंत्योदय योजनेतील लाभार्थ्यांना नियमित अन्नधान्याव्यतिरिक्त प्रति सदस्य प्रती महिना ५ किलो तांदुळ मोफत देण्याबाबत शासनाकडून आदेश प्राप्त झाले आहेत. त्यानुसार संबंधित लाभार्थ्यांना वरील ठिकाणी गर्दी न करता एक मीटर अंतर ठेवत एकूण 531 पात्र कार्ड धारकांपैकी 527 कार्ड धारकांना आलेल्या एकूण 117 क्विंटल पैकी 116.50 क्विंटल तांदळाचे वाटप करण्यात आल्याचे कोवाडचे सर्कल श्री. जिनराळे व तलाठी दीपक कांबळे यांनी सांगितले.
जेष्ठ नागरिक व वयस्क कार्ड धारकांची वेगळी रांग करून त्यांना शक्य तो लवकर धान्य वाटप करून त्यांच्या तब्बेतीची काळजी ही घेण्यात आली असल्याचे सेवा संस्थेचे चेअरमन अशोकराव देसाई यांनी सांगितले. यावेळी जि. प. सदस्य कल्लाप्पाणा भोगण, सेवा संस्थेचे व्हा. चेअरमन पुंडलिक जाधव,आदम मुल्ला, कोतवाल राजू वांद्रे, आप्पा व्हन्याळकर, रणजित भातकांडे, राजाराम वांद्रे, रामदास पाटील, निखिल पाटील, विश्वनाथ वांद्रे, अर्जुन वांद्रे, वैभव हनूरकर उपस्थित होते. सर्व वाटप करण्यासंबंधीचे नेटके नियोजन हे सचिव मारुती पाटील, विष्णू बुरुड, पिंटू धर्मोजी, रणजित भातकांडे आणि रामा घोरपडे यांनी केले.

No comments:

Post a Comment