चंदगड / प्रतिनिधी
बेळगाव - उद्यमबाग येथील कलाश्री बंब व स्टील फर्निचर यांच्यातर्फे कोरोनाबाबत मराठी व कन्नड़ माध्यमात ऑनलाईन निबंध व काव्यलेखन स्पर्धा आयोजित केल्याची माहिती कलाश्री बंब चे संचालक प्रकाश डोळेकर यांनी दिली. सध्या कोरोनाने सर्वत्र कहर केला आहे. कोरोनाबाबत काय खबरदारी घ्यावी, कोरोना कसा मुक्त होईल, आपण सुरक्षित कसे रहावे, सोशल डिस्टन्सचे महत्व, या काळात ताण तणाव कसा दूर करता येईल याबाबत माहितीपर निबंध व काव्य लेखन करावयाचे आहे. सदर स्पर्धा सर्वासाठी खुली असून लेखन ई-मेल, व्हाट्सअप वा पोस्टद्वारे पाठवायचे आहे. विजेत्यांना अनुक्रमे 2100, 1501, 1001, 701, 501 अशी बक्षिसे देण्यात येतील. इच्छुकांनी नावे नोंद करुन 30 एप्रिल पर्यंत लेखन साहित्य पाटवावे, असे आवाहन कलाश्री बंबचे जनसंपर्क अधिकारी संजय भोसले (मोबा. 9449211158) यांनी केले आहे. विजेत्यांना कलाश्री 2020 च्या पहिल्या लकी ड्रॉ बक्षीस वितरण प्रसंगी बक्षिसे देण्यात येतील.
No comments:
Post a Comment