चंदगड पोलिसांकडून पाटणे फाटा (ता. चंदगड) येथे दुचाकीवर कारवाई करुन दुचाकी ट्रॅक्टरमध्ये भरुन घेवून जाताना. |
बेळगाव जिल्ह्यात वाढत्या करोनाच्या पार्श्वभूमीवर चंदगड तालुक्यात संचारबंदी अधिक कडक केली आहे. त्यामुळे चंदगड तालुक्यात पोलिस गस्त घालत आहेत. आज दिवसभरात चंदगड पोलिसांनी 39 गाड्यांच्यावर तिब्बल सीट, लायसन्स नसणे व अन्य कारणासाठी कारवाई करत 7800 रुपयांचा दंड वसुल केला आहे. तसेच 12 दुकाचीस्वारावर विनाकारण रस्त्यावर फिरल्यामुळे संचारबंदी 118 आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गाड्या जप्त करुन कारवाई केली आहे. चंदगड पोलिसांनी चंदगड शहर व पाटणे फाटा या दोन वर्दळीच्या ठिकाणी ही कारवाई केली. करोनाचा प्रादुर्भाव देशासह राज्यातही दिवसेनदिवस वाढत आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या वतीने 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. या काळात संचारबंदी आदेश लागू केला आहे. तरीही अनेक दुचाकीस्वार रस्त्यावर फिरत आहेत. त्यामुळे चंदगड पोलिसांनी ही कारवाई केली. चंदगडचे पोलिस निरिक्षक अशोक सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव जाधव, दिलिप येसादे, रावसाहेब कसेकर, जमीर मकानदार, दिलीप पाटील, दिपक पाचवडेकर यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईमुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर वचक बसेल.
No comments:
Post a Comment