ग्रामीण भागात मास्क वापराबाबत जनजागृती करण्याची गरज - चंदगड लाईव्ह न्युज

18 April 2020

ग्रामीण भागात मास्क वापराबाबत जनजागृती करण्याची गरज

शिनोळी / प्रतिनिधी 
          कोरोना प्रतिबंधासाठी  संचारबंदी, परस्पर सामाजिक अंतरासह मास्क वापरासंबधी तज्ज्ञ जीव तोडून सांगत आहे. याबाबत आरोग्य, गृह,महसूलसह संबंधित व इतर यंत्रणा प्रबोधन, समुपदेशन तसेच कडक समज देत असतानाही अनेक ठिकाणी बेपर्वाई दिसत आहे.
          खेड्यापाड्यात बाजार, रेशनिंग व डेअरीत दुध घातणे या कारणामुळे लोक एकत्र येतात. दिवसभर वेगवेगळ्या ठिकाणी निमित्त परत्वे फिरलेले लोक यासाठी एकाचवेळी एकत्र येतात. या ठिकाणी परस्पर सामाजिक अंतरासह मास्क वापर करण्याची सक्ती गावोगावच्या दुकानांसह दुध संकलन केंद्रावर केली जाणे गरजेचे आहे. उल्लंघन करणाऱ्यावर स्थानिक दक्षता समितीकडून तात्काळ योग्य कारवाई करावी. चंदगड तालूक्याच्या शेजारील बेळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोना बाधितांची वाढती संख्या पहाता प्रशासनाच्या अद्ययावत सुचनांचे गांभीर्यपुर्वक अनुपालन सर्व गावांतील नागरीकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यामुळे या नियमांचे पालन केल्यास त्यामुळे सर्वांची सुरक्षा अबाधित राहणार आहे. 



No comments:

Post a Comment